पणजी: गतमोसमात खेळलेला जेम्स डोनाकी पुन्हा ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर एफसी गोवा (FC Goa) संघाने आगामी इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचाच (Australia) बचावपटू निवडला आहे. त्यांनी डायलन फॉक्स (Dylan Fox) याच्याशी एका वर्षाचा करार केला.
फॉक्स 27 वर्षांचा असून गतमोसमात गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटे संघातर्फे आयएसएल स्पर्धेत खेळला होता, तेव्हा त्या संघाने स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला होता, त्यात फॉक्सचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले होते. हस्तांतरण शुल्कासह संबंधित कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारपासून फॉक्स अधिकृतपणे एफसी गोवा संघात दाखल झाला.
"एफसी गोवा संघाच्या संपर्कात मी गतमोसम संपल्यापासून होतो, आता करार प्रक्रिया पूर्ण झाल्याने मी रोमांचित झालो आहे. या करारासाठी आम्ही इच्छुक होतो. गतमोसमात त्यांच्या खेळाची पाहून मी चाहता बनलो होतो, त्यामुळे मी या संघाचा भाग बनण्यास इच्छुक होतो. आता मोसम सुरू होण्यासाठी आतूर आहे," अशी प्रतिक्रिया फॉक्स याने दिली.
मोसमातील दुसरा परदेशी
एफसी गोवाने आगामी मोसमापूर्वी करारबद्ध केलेला फॉक्स हा दुसरा नवा परदेशी फुटबॉलपटू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आघाडीफळीसाठी स्पॅनिश येराम काब्रेरा याला करारबद्ध केले होते. फॉक्स गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडतर्फे 21 सामने खेळला. सेंटर बॅक जागी खेळणारा हा फुटबॉलपटू यापूर्वी ऑस्ट्रेलियातील ए-लीग स्पर्धेत वेलिंग्टन फिनिक्सकडून तीन मोसम, तर सेंट्रल कोस्ट मरिनर्सतर्फे एक मोसम खेळला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.