Goa : करूणा फुटबॉल प्रतिष्ठानची वंचित मुलींसाठी फुटबॉल अकादमी

Goa : देशभरातील २४ मुलींची प्रशिक्षणासाठी निवड

Goa : Trainees of Karuna Football Foundation's girls' resident football academy.
Goa : Trainees of Karuna Football Foundation's girls' resident football academy.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी ः गोव्यातील (Goa) करूणा फुटबॉल प्रतिष्ठानची (Karuna Football Foundation) वंचित मुलींसाठी राष्ट्रीय पातळीवरील निवासी फुटबॉल अकादमी (Residential Football Academy) रविवारी राष्ट्रीय क्रीडादिनी नुवे येथील होली रोझरी कॉन्व्हेंट हायस्कूल संकुलात सुरू झाली. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, गोवा फुटबॉल विकास मंडळाचे (जीएफडीसी) अध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे राष्ट्रीय तांत्रिक संचालक सावियो मदेरा यांच्या उपस्थितीत अकादमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. ग्रामीण गोव्यातील मुलींच्या फुटबॉलला प्रेरणा देणे हा अकादमीचा मुख्य उद्देश आहे. अकादमी गोव्यातील १४ मुलींव्यतिरिक्त मणिपूरमधील पाच, तमिळनाडूतील तीन, तर केरळ व महाराष्ट्रातील प्रत्येकी एक मुलगी आहे.


Goa : Trainees of Karuna Football Foundation's girls' resident football academy.
Goa: पेडे हॉकी स्टेडियमला ध्यानचंद यांचे नाव

अकादमी उद्‍घाटनाच्या वेळेस महिला फुटबॉलपटूमध्ये दिग्गज कामगिरी केलेल्या गोव्याच्या माजी खेळाडूंना गौरविण्यात आले. यामध्ये योलांडा डिसोझा, ज्युलियाना गुरजाव-कुलासो, सुकोरिना परेरा, रितिन्हा परेरा, मारिया रिबेलो यांचा समावेश होता. करूणा प्रतिष्ठानच्या अकादमीस सर्वोत्तम प्रशिक्षक, फिजिओथेरापिस्ट, आहारतज्ज्ञ पुरविण्यासाठी, तसेच फातोर्डा येथे कृत्रिम टर्फ मैदानावर सरावाची संधी देण्याबाबत राज्य सरकार सहकार्य करेल, असे आश्वासन प्रभुदेसाई यांनी दिले. मुलींच्या फुटबॉल अकादमीत यूईएफए परवानाधारक जर्मनीचे हैदी शूनेमन यांची तांत्रिक संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मारियो आगियार अकादमीचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मारिया रिबेलो व नाओमी वासे या सहाय्यक प्रशिक्षक आहेत.

बेरोजगार पालकांच्या मुली...

करूणा प्रतिष्ठानच्या फुटबॉल अकादमीत निवडण्यात आलेल्या मुलींचे पालक बेरोजगार आहेत. कोरोना विषाणू महामारीच्या काळात या मुलींच्या पालकांना रोजगार गमवावा लागला. त्या मुलींच्या गुणवत्तेला आता अकादमीत खतपाणी घातले जाईल. मुलींच्या शिक्षणाची सोय होली रोझरी स्कूलमध्ये करण्यात आली असून राय येथील एसव्हीडी मैदानावर सराव केंद्र असेल.


Goa : Trainees of Karuna Football Foundation's girls' resident football academy.
Goa : तंदुरुस्ती सप्ताहाच्या सुरवातीस क्रीडा चुरस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com