Cameron Bancroft | Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

Yoga Day 2023: बॉल टेंपरिंगमध्ये अडकल्यानंतर बदलले 'त्या' खेळाडूचे आयुष्य, क्रिकेट सोडून बनणार होता योगा टीचर

Pranali Kodre

Cameron Bancroft revealed he Almost Gave Up Cricket to become yoga teacher: भारतीय संस्कृतीत योगसाधनेला प्रचंड महत्त्व आहे. आता योगसाधनेला केवळ भारतातच नाही, जर जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे. योगसाधनेने आध्यात्मिक, मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगले राहते. याचा फायदा अनेक खेळाडूंनाही झाल्याची उदाहरणे अनेक आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टने तर योगसाधनेसाठी क्रिकेटही सोडण्याचा विचार केलेला.

मार्च 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटीत समोर आलेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात तत्कालिन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यासह ज्या खेळाडूचे नाव समोर आले होते, खरंतर ज्याच्याकडे सँडपेपर सापडला होता, तो खेळाडू बॅनक्रॉफ्ट होता.

त्या प्रकरणामुळे स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर तर एक वर्षाची बंदी आली होती, तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. पण या प्रकरणानंतर बॅनक्रॉफ्टचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. त्याने त्याची बंदी संपण्यापूर्वी काहीदिवस आधी स्वत:लाच पत्र लिहिले होते, ज्यात त्याने योगसाधनेने त्याच्यावर किती प्रभाव पाडला हे सांगितले होते.

त्याने सांगितले होते की त्याच्यावर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे मार्गदर्शक ऍडम वोग्स यांचाही प्रभाव होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की लँगरही योगसाधनेला खूप महत्त्व देतात.

बॅनक्रॉफ्टने त्याच्या पत्रात लिहिले होते की 'जोपर्यंत तुला हे कळत नाही की तू कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट आहे, जो व्यावसायिक क्रिकेटपटू आहे आणि तू क्रिकेटपटू कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट नाही, तोपर्यंत तू पुढे जाऊ शकणार नाही. हा नक्कीच तुझ्यासाठी महत्त्वाचा क्षण आहे.'

बॅनक्रॉफ्टने त्याच्या बंदीच्या काळात मेलबर्नमध्ये योगाचे प्रशिक्षण देण्याचा कोर्सही पूर्ण केला होता. त्याबद्दल त्याने लिहिले होते, 'तू शरीरशास्त्र, आसने, अलाईनमेंट, तत्वज्ञान कसे शिकवावे हे शिकला; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू हे शिकला की तुझे आयुष्य एका चांगल्या उद्देशासाठी वापरू शकतो.'

'सारखीच आवड असणारे नवीन मित्र मिळतील, चांगली लोक मिळतील. कदाचीत क्रिकेट तुझ्यासाठी नाही. तू स्वत:ला विचार तू परत यायला तयार आहेस का? योगा हा खूप परिपूर्ण अनुभव आहे.'

'तू तुझ्यापेक्षा मोठी लढाई लढणाऱ्य लोकांना भेटशील, पण तुझ्या मेहनतीने आणि प्रवासाने तू योगाच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देऊ शकतो.'

दरम्यान, बॅनक्रॉफ्टने योगा प्रशिक्षक बनण्याचा विचार केला असला, तरी क्रिकेटच्या प्रेमापोटी त्याने खेळणे सुरू ठेवले. त्याने बंदीनंतर बिग बॅश लीग आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने ऑस्ट्रेलियासाठी पुन्हा कसोटी क्रिकेटही खेळले.

अद्यापही त्याने क्रिकेट खेळणे सुरू ठेवले आहे. पण असे असले तरी त्याने योगसाधनेला दूर ठेवलेले नाही. तो योगाबद्दल अनेकदा सोशल मीडियावर पोस्टही करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT