Australia Cricket team 
क्रीडा

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाने सलग तिसरी मॅचच जिंकली नाही, तर वर्ल्डकपमध्ये नवा इतिहास रचलाय!

Australia vs Netherlands: ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध 309 धावांनी विजय मिळवत वर्ल्डकप इतिहात नवा विश्वविक्रम केला आहे.

Pranali Kodre

Australia registered biggest Win in ODI Cricket World Cup History:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात सामना झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 309 धावांनी विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर मिळवलेला सलग तिसरा विजय आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने या विजयासह एक मोठा विश्वविक्रम नोंदवला.

ऑस्ट्रेलियाने 309 धावांनी मिळवलेला हा विजय वनडे वर्ल्डकपच्या इतिहासातील धावांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय आहे. त्यांनी त्यांचाच यापूर्वीचा विश्वविक्रम मोडला आहे. 2015 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला 275 धावांची पराभूत केले होते.

तसेच ऑस्ट्रेलियाचा 309 धावांनी मिळवलेला विजय वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

वनडेमध्ये धावांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विश्वविक्रम सध्या भारताच्या नावावर आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध याचवर्षी तिरुवनंतरपुरम येथे 317 धावांनी विजय मिळवला होता.

वनडेमध्ये धावांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय मिळवणारे संघ -

  • 317 धावा - भारत विरुद्ध श्रीलंका, तिरुवनंतपुरम, 2023

  • 309 धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स, दिल्ली, 2023

  • 304 धावा - झिम्बाब्वे विरुद्ध अमेरिका, हरारे, 2023

  • 290 धावा - न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड, अबेर्डिन, 2008

  • 275 धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ, 2015

ऑस्ट्रेलियाचा विजय

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 399 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावांची खेळी केली. तसेच वॉर्नरने 93 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी केली.

त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने 71 धावांची आणि मार्नस लॅब्युशेनने 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. नेदरलँड्सकडून लोगन वॅन बिकने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 400 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सला 21 षटकात सर्वबाद 90 धावाच करता आल्या. नेदरलँड्सकडून विक्रमजीत सिंगने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त नेदरलँड्सकडून कोणालाही 15 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍडम झम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तसेच मिचेल मार्शने 2 विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT