India vs Australia | Suryakumar Yadav - Ruturaj Gaikwad BCCI
क्रीडा

IND vs AUS, T20: भारताची तोडफोड फलंदाजी! यशस्वी, ऋतुराज, ईशानची अर्धशतके, ऑस्ट्रेलियासमोर 236 धावांचे आव्हान

India vs Australia: दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियासमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 2nd T20I Match at Thiruvananthapuram

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (26 नोव्हेंबर) खेळला जात आहे. हा सामना तिरुवनंतपुरमधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असून भारताने ऑस्ट्रेलियासमोर 236 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सलामीला एक बाजू उपकर्णधार ऋतुराज गायकवाडने सांभाळलेली असताना दुसऱ्या बाजूने यशस्वी जयस्वालने आक्रमक फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले.

मात्र त्यानंतर लगेचच तो बाद झाला. त्याने 25 चेंडूत 53 धावांची खेळी केली, ज्यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तो बाद झाल्यानंतर ईशान किशननेही आक्रमक खेळ केला.

ईशाननेही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल करताना अर्धशतक केले. पण तोही अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याने 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 52 धावांची खेळी केली.

यानंतरही कर्णधार सूर्यकुमार यादवने हीच लय कायम ठेवली आणि २ खणखणीत षटकार मारले. पण तो त्याची खेळी मोठी करू शकला नाही आणि 10 चेंडूत 19 धावा करून बाद झाला.

या विकेट्स जात असताना एक बाजू सांभाळलेल्या ऋतुराजनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याने 39 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.

दरम्यान, त्याच्या अर्धशतकानंतर रिंकू सिंगनेही 19 व्या षटकात तब्बल 25 धावा चोपल्या. त्यामुळे भारताने 200 धावांचा टप्पा सहज पार केला. ऋतुराज अखेरच्या षटकात 43 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 58 धावा करून बाद झाला.

अखेरीसही तिलक वर्मा 2 चेंडूत एका षटकारासह 7 धावांवर नाबाद राहिला, तर रिंकू सिंग 9 चेंडूत 31 धावांवर नाबाद राहिला. रिंकूने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यामुळे भारताने 20 षटकात 4 बाद 235 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने ३ विकेट्स घेतल्या, तर मार्कस स्टॉयनिसने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT