Australia Cricketers Screengrab: X/7Cricket
क्रीडा

AUS vs PAK: कागदाचा एक तुकडा, पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा घाम काढला, मग स्मिथने थेट खिशातच घातला; पाहा Video

Pranali Kodre

Australia vs Pakistan, 1st Test at Perth, Funny Video:

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून पहिला सामना पर्थला पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध चौथ्याच दिवशी तब्बल 360 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान एक मजेशीर घटनाही घडली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर ४५० धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि सौद शकिल हे या आव्हानाचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंना एका कागदाच्या तुकड्याने सतवले.

झाले असे की बाबर आणि शकिल फलंदाजी करताना मैदानात अचानक एक कागदाचा तुकडा उडून आला. तो तुकडा पकडण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, उस्मान ख्वाजा असे खेळाडू प्रयत्न करत होते.

मात्र अखेर स्मिथने येऊन तो वेगात उडणारा कागद पकडला आणि खिशात घातला. यावेळी त्याने तो कागद पकडल्याबद्दल मजेने सेलिब्रेशन करतानाही दिसला. तसेच त्याने डेव्हिड वॉर्नरलाही टाळ्या देत सेलिब्रेशन केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर 450 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव  30.2 षटकात अवघ्या 89 धावांतच आटोपला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 113.2 षटकात सर्वबाद 487 धावा केल्या. 

त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात 101.5 षटकात सर्वबाद 271 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 216 धावांची आघाडी मिळाली. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 63.2 षटकात 5 बाद 233 धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडीसह पाकिस्तानसमोर 450 धावांचे आव्हान ठेवले होते.

आता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात बॉक्सिंग डे कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना 26 ते 30 डिसेंबरदरम्यान होणार आहे. हा सामना मेलबर्नला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT