Australia Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने केला मोठा विक्रम, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात...

Australia becomes No.1: अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Manish Jadhav

Australia becomes No.1: अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजाने पहिल्या दिवशी शानदार शतक झळकावले.

दरम्यान, आजच्या सामन्यात तो हळूहळू द्विशतकाकडे वाटचाल करत आहे. ग्रीनने आज शानदार शतक झळकावले. आज म्हणजेच कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिली 10 षटके खेळताच त्यांच्या नावावर एक मोठा विक्रम झाला. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या नावावर मोठा विक्रम

अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाने 10 षटके खेळून मोठा विक्रम केला. गेल्या दहा वर्षांत भारतात (India) सर्वाधिक वेळा 100 षटके खेळणारा ऑस्ट्रेलियन संघ पहिला संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने दहा वर्षांत सहाव्यांदा भारतात 100 षटके खेळली आहेत.

या संघांचा या यादीत समावेश आहे

100 षटके खेळणारा ऑस्ट्रेलिया या यादीत पहिला ठरला आहे. याआधी इंग्लंडने गेल्या दहा वर्षांत पाच वेळा 100 हून अधिक षटके खेळली आहेत. दक्षिण आफ्रिकेने तीन वेळा 100 पेक्षा जास्त षटके खेळली आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत 133 षटके खेळली आहेत. ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा विक्रम आहे.

ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 350 च्या पुढे गेली

या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ प्रत्येक धावेने आपली स्थिती मजबूत करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या दिवसाच्या धावसंख्येने 350 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

सलामीवीर उस्मान ख्वाजा 150 हून अधिक धावा केल्यानंतर अजूनही क्रीजवर आहे, तर कॅमेरुन ग्रीनने सकाळी अर्धशतक केले आणि नंतर त्याचे शतकात रुपांतर केले.

मात्र, शतक झळकावून तो बाद झाला, ग्रीनने 114 धावांची खेळी खेळली. त्याला रविचंद्रन अश्विनने आपला बळी बनवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

SCROLL FOR NEXT