Steven Smith  Dainik Gomantak
क्रीडा

Australia Vs West Indies: 50 षटकांचा सामना 7 षटकांत संपला... गाबाचं मैदान मारणाऱ्या चॅम्पियन संघाची दयनीय अवस्था

Australia Vs West Indies ODI Match: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचणाऱ्या दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाची दयनीय अवस्था पाहायला मिळाली.

Manish Jadhav

Australia Vs West Indies ODI Match: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचणाऱ्या दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाची दयनीय अवस्था पाहायला मिळाली. अलीकडेच वेस्ट इंडिज संघाने गाबा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन इतिहास रचला होता. मात्र आता तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्यांचा वाईट पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा क्लीन स्वीप केला आहे. पण मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात मोठा आणि लाजिरवाणा पराभव झाला. या सामन्यात कांगारु संघाने अवघ्या 7 षटकांत विजय मिळवला.

वेस्ट इंडिजचा संघ केवळ 86 धावांवर गडगडला

दरम्यान, मंगळवारी (6 फेब्रुवारी) कॅनबेरा येथे मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर विंडीजचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र, फलंदाजी करताना त्यांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.

संपूर्ण संघ अवघ्या 24.1 षटकांत 86 धावांत गारद झाला. संघासाठी एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. सलामीवीर अलिक अथानाझने सर्वाधिक 32 धावा केल्या. रोस्टन चेसने 12 आणि केसी कार्टीने 10 धावा केल्या. याशिवाय, एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने सर्वाधिक 4 बळी घेतले. लान्स मॉरिस आणि ॲडम झाम्पाने 2-2 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने अवघ्या 7 षटकांत सामना जिंकला

यानंतर यजमान कांगारु संघ 87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आला तेव्हा त्यांनी 8 विकेट्स राखून सामना सहज जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 6.5 षटकात 2 गडी गमावून 87 धावा केल्या. सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कने संघाकडून सर्वाधिक 41 धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर जोश इंग्लिश 35 धावा करुन नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि ओसेन थॉमस यांनी 1-1 विकेट घेतली. याशिवाय, एकाही फलंदाजाला कांगारु संघावर दबाव आणता आला नाही. जोसेफने जेक फ्रेझर-मॅकगर्कला आपला बळी बनवले होते. तर थॉमसने ॲरॉन हार्डीला (2) बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT