
Mohammad Siraj on Fans Trolling
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा सध्या जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने आपल्या अद्भुत गोलंदाजीने २३ बळी घेतले आणि सोशल मीडियावर प्रचंड कौतुक मिळवले. मात्र, आपल्या यशाच्या मागे काही वेदनादायक अनुभवही आहेत, जे सिराजने नुकतीच एका मुलाखतीत उघड केले आहेत.
सिराजने सांगितले की, एक सामना चांगला जरी गेला तरी लोक आपल्याला ‘हीरो’ म्हणतात, परंतु जर पुढच्या सामन्यात अपयश आलं तर ट्रोलिंग सुरू होते. जेव्हा तुम्ही चांगले प्रदर्शन करता तेव्हा संपूर्ण जग तुमच्यासोबत असते. लोक म्हणतात की ‘जगात सिराजसारखा गोलंदाज नाही’. परंतु जर पुढचा सामना चांगला गेला नाही, तर लगेचच काही लोक म्हणतात, ‘हा कसला गोलंदाज आहे? तुम्ही त्याला कुठून आणले?’ ‘ऑटो चालवायला जा’,” अशी टीका आपल्यावर होते असं सिराजनं स्पष्ट केलं.
त्याने पुढे सांगितले की, सुरुवातीला या प्रकारच्या ट्रोलिंगमुळे त्याला मानसिक त्रास झाला, परंतु आता त्याने स्वतःमध्ये समजूत करून घेतली आहे. "मला आता कळले आहे की लोकांच्या मतांची पर्वा करणे फायद्याचे नाही. मला महत्त्वाचे आहे की माझ्या कुटुंबाचे आणि संघातील सहकाऱ्यांचे विचार काय आहेत. मी फक्त माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करतो."
सिराजची कामगिरी फक्त इंग्लंडविरुद्धच नाही तर वेस्ट इंडिजविरुद्धही स्फोटक ठरली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी अहमदाबादमध्ये खेळली गेली. या सामन्यात सिराजने पहिल्या डावात वेस्ट इंडिजसाठी चार फलंदाजांना बाद केले, तर दुसऱ्या डावात तीन बळी घेऊन आपली टीम विजयी मार्गावर ठेवली. त्याची गोलंदाजी सामन्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रभावी होती.
सिराजच्या यशाचे गूढ फक्त त्याच्या कौशल्यात नाही, तर मानसिक तयारीतही आहे. ट्रोलिंगचा सामना करताना त्याने दाखवलेली मानसिक ताकद, संघासाठी त्याची निष्ठा आणि सतत उत्कृष्ट कामगिरी त्याला भारतीय क्रिकेटच्या महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक बनवते. आता सिराजची नजर पुढील कसोटी आणि आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आहे, जिथे त्याला आपले कौशल्य पुन्हा सिद्ध करायचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.