India Vs Australia Hockey Dainik Gomantak
क्रीडा

India Vs Australia Hockey: तब्बल 11 गोलची नोंद झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

India Vs Australia Hockey: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय हॉकी संघाला रविवारी 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमानांविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. मेट स्टेडियम, ऍडलेड येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 7-4 अशा फरकाने पराभूत केले.

ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. याआधी पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5-4 अशा फरकाने विजय मिळवला होता.

या सामन्यात भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग (3', 60'), हार्दिक सिंग (25') आणि राहील मोहम्मद (36') यांनी गोल केले. तसेच ऑस्ट्रेलियासाठी ब्लॅक गोवर्सने गोलची हॅट्रिक (12', 27', 53') साधली. तसेच जॅक वेल्चने दोन गोल (17', 24') नोंदवले. जेकॉब अँडरसन (48') आणि जॅर व्हेटन (49') यांनीही ऑस्ट्रेलियासाठी प्रत्येकी एक गोल केला.

भारताने (Indian Men's Hockey team) सामन्याची सुरुवात चांगली केली होती. तिसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने (Harmanpreet Singh) गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. यातून सावरायला ऑस्ट्रेलियाला थोडा वेळ लागला. पण त्यांनी 12 व्या मिनिटालाच बरोबरी साधण्यात यळ मिळवले.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखत भारतीय बचावा संघर्ष करायला लावला. त्यांच्याकडून वेल्चने 17 आणि 24 व्या मिनिटाला गोल केला आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात 3-1 अशा आघाडीवर आले. पण भारतानेही हार मानली नाही आणि मिडफिल्डर हार्दिक सिंगने 25 व्या मिनिटाला शानदार गोल केला. पण त्यानंतर लगेचच 27 व्या मिनिटाला गोवर्सचा गोल झाल्याने ऑस्ट्रेलियाची आघाडी 4-2 अशी वाढली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने चांगले आक्रमण केले. राहीलनेही चांगली विविधता दाखवत 36 व्या मिनिटाला शानदार गोल केला. या गोलने ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी केली. मात्र, शेवटच्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलिया अधिक आक्रमक झाले.

त्यांच्याकडून अँडरसनने 48 व्या, व्हेटनने 49 व्या मिनिटाला गोल नोंदवले. तसेच गोवर्सने 53 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर ऑस्ट्रेलियासाठी सातवा गोल केला. त्यामुळे भारताला संघाला नंतर परतफेडीची संधी जास्त मिळाली नाही. अखेरच्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

आता भारताला मालिकेतील आव्हान टिकवून ठेवायचे असेल, तर 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Rate Today: सोनं, चांदी झालं महाग! काय आहेत मुंबई, गोवा, पुणे आणि नागपुरात ताजे भाव? वाचा

'त्यांचे वय झाल्याने त्यांना आदल्या दिवशी काय बोललो, याची आठवण नसावी', वीजदरवाढीच्या गोंधळावरून आपची ढवळीकरांवर टीका

Goa Village Survey: 'मच्छीमार' गावांचे सीमांकन वादग्रस्त! तज्ज्ञांकडून तपासाची मागणी; नकाशांचा शहानिशा अनिवार्य

Goa Agricultural College: अभिमानास्पद! गोवा कृषी महाविद्यालयाला ICAR ची अधिमान्यता, मिळणार राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

Goa Court Verdict: 'मी मैत्रिणीच्या घरी होते'! पीडितेने दिली नाही साथ, अपुरे पुरावे; अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचारप्रकरणी आरोपी निर्दोष

SCROLL FOR NEXT