India Vs Australia Hockey: ऑस्ट्रेलियाचा भारतावर रोमांचक विजय, आकाशदीपची हॅट्रिक व्यर्थ

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 5-4 गोलफरकाने विजय मिळवला आहे.
India Vs Australia Hockey
India Vs Australia HockeyDainik Gomantak
Published on
Updated on

India Vs Australia Hockey: भारतीय हॉकी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 5 सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामना 26 नोव्हेंबर रोजी पार पडला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने 5-4 अशा फरकाने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली.

मेट स्टेडियम, ऍडलेड येथे झालेल्या रोमांचकारी झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी विजयाची पराकाष्ठा केली. मात्र अखेरच्या काही मिनिटात ऑस्ट्रेलियाकडून ब्लॅक गोव्हर्सने केलेल्या दोन गोलमुळे भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

भारताकडून (Indian Men's Hockey team) फॉरवर्डला खेळणारा आकाशदीप सिंगने (Akashdeep Singh) हॅट्रिक केली. त्याने 10 व्या, 27 व्या आणि 59 व्या मिनिटाला गोल केले. तसेच हरमनप्रीस सिंगने 31 व्या मिनिटाला गोल केला. ऑस्ट्रेलियासाठी लॅचलन शार्पने 5 व्या, नॅथन एफ्राम्सने 21 व्या, टॉम क्रेगने 41 व्या मिनिटाला गोल केले. तसेच ब्लॅग गोव्हर्सने 57 व्या आणि ज्यादा वेळेत असे दोन गोल नोंदवले.

India Vs Australia Hockey
CWG 2022: भारतीय महिला हॉकी संघाने बर्मिंगहॅममध्ये फडकवला तिरंगा, न्यूझीलंडला हरवून जिंकले कांस्य

दरम्यान सामन्यात पहिल्या क्वार्टरपासूनच चढाओढ झालेली दिसून आली. ऑस्ट्रेलियाच्या स्पीडसमोर भारताने तोडीची लढत दिली. मात्र, सामन्याच्या 5 व्या मिनिटालाच लॅचलन शार्पने गोल नोंदवत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतरही भारताने शांत राहात आपला खेळ केला. अखेर 10 व्या मिनिटाला आकाशदीपने भारतासाठी गोल करत बरोबरी साधून दिली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये टॉम क्रेगने मिडफिल्डवर वर्चस्व ठेवले. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला दुसरा गोल करण्यात झाला. एफ्राम्सने 21 व्या मिनिटाला गोल करत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. त्याचा गोल भारतीय गोलरक्षक कृष्णा पाठकला रोखता आला नाही. पाठक दुसऱ्या क्वार्टरमध्ये श्रीजेसच्या जागेवर गोलरक्षक म्हणून आला होता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाची आघाडी फारवेळ भारताने टिकून दिली नाही. आकाशदीपने 27 व्या मिनिटाला गोल केला आणि पुन्हा बरोबरी साधून दिली. त्यानंतर लगेचच कर्णधार हरमनप्रीत सिंगने 31 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर शानदार गोल करत भारताला आघाडीवर नेले. पण तिसऱ्या क्वार्टरमध्ये टॉम क्रेगने 41 व्या मिनिटाला केलेल्या गोलने ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली.

अखेरच्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने आपला खेळ उंचावला. त्यांनी भारताला चूका करण्यास भाग पाडले. त्यांना 57 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर ब्लॅक ग्रोवर्सने गोल केला आणि ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वपूर्ण चौथा गोल नोंदवला. पण भारतानेही अखेरपर्यंत हार न मानता खेळ सुरू ठेवला.

आकाशदीपने 59 व्या मिनिटाला गोल करत त्याची हॅट्रिक साधत भारतालाही बरोबरीत आणले होते. मात्र, निर्धारित वेळेनंतर मिळालेल्या ज्यादाच्या वेळेस गोवर्सने पुन्हा एक गोल केला आणि अखेर या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आता या मालिकेतील दुसरा सामना 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com