Steve Smith-Matthew Wade Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: भारताविरुद्ध टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा! कमिन्स नाही, तर 'या' खेळाडूकडे कॅप्टन्सी

Pranali Kodre

Australia Announced Squad for T20I Series against India:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा 19 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर लगेचच 4 दिवसात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. 23 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा 15 जणांचा संघ जाहीर झाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या संघात सध्या वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या 8 खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडकडे सोपवण्यात आले आहे. यासह तो ऑस्ट्रेलियन संघातही पुनरागमन करेल.

तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस आणि ऍडम झम्पा या अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे. याबरोबरच जोश इंग्लिश, सीन ऍबॉट आणि वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाचा राखीव खेळाडू तन्वीर संघा यांनाही भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात सामील करण्यात आले आहे.

याबरोबरच या संघात टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट आणि नॅथन एलिस यांनाही संधी देण्यात आली आहे.

मात्र, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, अष्टपैलू मिचेल मार्श आणि कॅमेरॉन ग्रीन हे खेळाडू वर्ल्डकपनंतर मायदेशी परततील. ते मायदेशी ऑस्ट्रेलियाच्या आगामी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकांसाठी तयारी करतील.

असा आहे ऑस्ट्रेलिया संघ -

मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेऱ्हेंडॉर्फ, सीन ऍबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, टी20 मालिकेचे वेळापत्रक

  • 23 नोव्हेंबर - पहिला टी20 सामना, विशाखापट्टणम

  • 26 नोव्हेंबर - दुसरा टी20 सामना, तिरुवनंतपुरम

  • 28 नोव्हेंबर - तिसरा टी20 सामना, गुवाहाटी

  • 1 डिसेंबर - चौथा टी20 सामना, नागपूर

  • 3 डिसेंबर - पाचवा टी20 सामना, हैदराबाद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT