Australia | England Dainik Gomantak
क्रीडा

चूकीला माफी नाही! पहिल्याच Ashes मॅचनंतर ICC ने इंग्लंड - ऑस्ट्रेलियाचे कापले WTC पाँइंट्स

Pranali Kodre

Australia and England lost points from WTC 2023-25 tally: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना 20 जून रोजी संपला. एजबस्टनला झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. पण असे असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दोन्ही संघांवर कारवाई केली आहे.

या सामन्यात दोन्ही संघांकडून दोन्ही संघांकडून षटकांची गती कमी राखली गेल्याने दोन्ही संघांना सामना शुल्काच्या 40 टक्के दंड आकारण्यात आला आहे. तसेच दोन्ही संघांचे कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेतील प्रत्येकी 2 गुण कापण्यात येणार आहेत.

सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेपासून कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांवरील कारवाईला आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी मंजूरी दिली आहे. दोन्ही संघांनी निर्धारित वेळेपेक्षा प्रत्येकी 2 षटके उशीरा टाकली होती.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने चूक मान्य केली आहे. त्यामुळे यावर सुनावणी होणार नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्टी की ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकल्याने त्यांनी कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेत 12 गुण मिळवले होते. मात्र आता दोन गुण कापल्याने त्यांचे आता केवळ 10 गुण राहिले आहेत.

तसेच इंग्लंडला सामना पराभूत झाल्याने एकही गुण मिळाला नव्हता. मात्र, त्यामुळे आता त्यांच्या खात्यातही दोन गुणांची कपात झाल्याने त्यांचे गुण निगेटिव्हमध्ये गेले आहेत.

असे आहेत नियम

आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आचारसंहितेतील कलम 2.22 नुसार संघाने निर्धारित वेळेपेक्षा उशीरा टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी खेळाडूंच्या सामना शुल्कात 20 टक्के कपात केली जाते.

तसेच कसोटी चॅम्पियनशीपच्या 16.11.2 नियमानुसार निर्धारित वेळेपेक्षा उशीरा टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी एका गुणाची कपात केली जाते.

भारत आणि ऑस्ट्रेलियावरही झालेली कारवाई

यापूर्वी गेल्याच आठवड्यात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पार पडला होता, ज्यात ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवलेला. या सामन्यानंतरही षटकांची गती कमी राखल्याने दोन्ही संघांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले होते.

त्यावेळी भारतीय संघाचे 100 टक्के सामना शुल्क (match fees) कापले गेले होते, तसेच ऑस्ट्रेलियाचे 80 टक्के सामना शुल्क कापले गेले होते. भारतीय संघाने निर्धारित वेळेपेक्षा 5 षटके उशीरा टाकली, तर ऑस्ट्रेलियाने 4 षटके उशीरा टाकली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

SCROLL FOR NEXT