ICC Ranking: क्रिकेट जगताला मिळाला नवा नंबर-1 कसोटी फलंदाज, मार्नस लबुशेनकडून हिरावला मुकुट

Marnus Labuschagne: गेल्या 6 महिन्यांपासून नंबर-1 वर असलेल्या मार्नस लॅबुशेनचे मोठा फटका बसला आहे. ताज्या क्रमवारीत मार्नस लॅबुशेनची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
Marnus Labuschagne
Marnus LabuschagneDainik Gomantak
Published on
Updated on

Latest ICC Test Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यानंतर फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे.

गेल्या 6 महिन्यांपासून नंबर-1 वर असलेल्या मार्नस लॅबुशेनला मोठा फटका बसला आहे. ताज्या क्रमवारीत मार्नस लॅबुशेनची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्याचवेळी, त्याच्या जागी एक इंग्लिश खेळाडू जगातील नवा नंबर-1 कसोटी फलंदाज बनला आहे.

जगाला नवा नंबर-1 कसोटी फलंदाज मिळाला

ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी करणारा इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे. रुटला पाच अंकाचा फायदा झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात रुटने 118 आणि 46 धावा केल्या होत्या, ज्यामुळे त्याने नवीन कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याचवेळी, ऍशेस कसोटी सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यात मार्नस लॅबुशेनने 0 आणि 13 धावांची इनिंग खेळली.

Marnus Labuschagne
ICC Test Ranking मध्येही कागांरुंचेच वर्चस्व! 1984 नंतर पहिल्यांदाच घडला 'असा' विक्रम

या खेळाडूंना मोठे नुकसान

मार्नस लॅबुशेन व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांना कसोटी क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आहे. गेल्या आठवड्याच्या क्रमवारीत स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र या आठवड्यात तो सहाव्या स्थानावर घसरला आहे.

त्याचवेळी, मागील क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला ट्रॅव्हिस हेड ताज्या क्रमवारीत 874 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा केन विल्यमसन (Kane Williamson) क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

Marnus Labuschagne
ICC Rankings: किंग कोहलीला मोठा धक्का, 'या' नव्या खेळाडूची एन्ट्री; क्रमवारी बदलली

ऋषभ पंत अव्वल 10 मध्ये कायम आहे

टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या सात महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मात्र आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत तो अव्वल 10 मध्ये कायम आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ऋषभ पंतचा कार अपघात झाला, ज्यात तो जखमी झाला. सध्या तो एनसीएमध्ये पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com