India and Australia Test Team Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Ranking: टीम इंडियाकडून अवघ्या तीन तासात ऑस्ट्रेलियाने हिरावला 'नंबर वन'चा ताज!

अवघ्या तीन तासात ऑस्ट्रेलियाने भारताचा कसोटी क्रमवारीतील अव्वल क्रमांक हिरावला आहे.

Pranali Kodre

ICC Test Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत मंगळवारी काही बदल पाहायला मिळाले. या क्रमवारीत सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ अव्वल क्रमांकावर पोहचला आहे. त्यांनी भारतीय कसोटी संघाला मागे टाकले आहे.

विशेष गोष्ट अशी की मंगळवारी सकाळी ऑस्ट्रेलिया कसोटी संघ 116 रेटिंग पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर होता. पण दुपारी 1.30 च्या सुमारास ऑस्ट्रेलियाचे 111 रेटिंग पाँइंट्स झाले होते आणि ते कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर घसरले होते. त्यावेळी भारतीय संघाने 115 रेटिंग पाँइंट्स कायम ठेवत अव्वल क्रमांकावर कब्जा केला होता.

मात्र, आता दुपारी 4 वाजताच्या सुमारास आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीनुसार पुन्हा ऑस्ट्रेलिया संघ 126 रेटिंग पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर पोहचला असून भारत 115 रेटिंग पाँइंट्स कायम ठेवत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ICC Test Ranking

भारत-ऑस्ट्रेलियाचे अखेरच्या मालिकेत विजय

भारतीय कसोटी संघाने त्यांची अखेरची कसोटी मालिका बांगलादेश विरुद्ध डिसेंबर 2022 मध्ये खेळली होती. या मालिकेमध्ये भारताने 2-0 असा विजय मिळवला होता. तसेच ऑस्ट्रेलियाने अखेरची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. या मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते, तर तिसरा सामना अनिर्णित राहिला होता.

दरम्यान, आता 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात भारतात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23 स्पर्धेच्या (ICC Test Championship) अंतिम सामन्यात जागा पक्की करण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर कसोटी क्रमवारीतही अव्वल क्रमांकासाठी या दोन संघात चढाओढ पाहायला मिळू शकते.

पहिल्या पाच क्रमांकावरील संघ

आयसीसीच्या ताज्या कसोटी संघ क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर 107 रेटिंग पाँइंट्सनुसार इंग्लंड संघ आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर 102 रेटिंग पाँइंट्ससह दक्षिण आफ्रिका आणि 99 रेटिंग पाँइंट्ससह न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT