Liston Colaco Dainik Gomantak
क्रीडा

गोमंतकीय आघाडीपटू लिस्टन कुलासोची शानदार हॅटट्रिक

एएफसी कप फुटबॉल: बांगलादेशच्या बशुंधरा किंग्जवर चार गोलने सहज मात

दैनिक गोमन्तक

कोलकाता : गोमंतकीय आघाडीपटू लिस्टन कुलासोच्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर एटीके मोहन बागानने शनिवारी बशुंधरा किंग्ज संघावर 4-0 फरकाने एकतर्फी विजय नोंदविला. या निकालामुळे कोलकात्यातील संघाचे एएफसी कप स्पर्धेतील आव्हानही कायम राहिले. (atk mohun bagan beats Bashundhara Kings in aafc football tournament)

अगोदरच्या ड गट लढतीत गोकुळम केरळाकडून हार पत्करलेल्या एटीके मोहन बागानसाठी शनिवारचा सामना जिंकणे अत्यावश्यक होते. पावसाळी आणि वादळी वातावरणात त्यांनी धडाकेबाज खेळ केला. पूर्वार्धातील अकरा मिनिटांच्या खेळानंतर प्रतिकुल हवामानामुळे सुमारे तासभर सामना खंडित झाला.

बशुंधरा किंग्ज हा बांगलादेशातील प्रीमियर लीग विजेता संघ आहे. त्यांच्याविरुद्ध लिस्टनने नऊ मिनिटांत दोन गोल केले. त्याने पहिला गोल 25व्या, तर दुसरा गोल 34व्या मिनिटास नोंदविला. डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर लिस्टनने ५३व्या मिनिटास हॅटट्रिकचा मान मिळविला. एटीके मोहन बागानचा चौथा गोल बदली खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने 77व्या मिनिटास केला. एटीके मोहन बागानचे आता दोन लढतीतून तीन गुण झाले आहेत. त्यांचा पुढील सामना माझिया क्लबविरुद्ध होईल.

लिस्टनचा धडाकेबाज खेळ

लिस्टनने कार्ल मॅकह्यू याच्या असिस्टवर पहिला गोल केला. नंतर 23 वर्षीय खेळाडूने जॉनी काऊकोच्या अप्रतिम पासवर सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल केला. उत्तरार्धात मानवीर सिंगने रचलेल्या चालीवर लिस्टनने प्रतिस्पर्धी खेळाडू खालेद शफी याला गुंगारा दिला. काऊको याच्या जागी मैदानात आलेल्या विल्यम्सने एटीके मोहन बागानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT