ATK Mohan Bagan Kishor Petkar
क्रीडा

एटीके मोहन बागानची स्थिती बिकट

अंतिम फेरीसाठी हैदराबादला मोठ्या फरकाने नमविणे आवश्यक

दैनिक गोमन्तक

पणजी : एटीके मोहन बागानची स्थिती बिकट असून त्यांच्यासमोर खूपच कठीण आव्हान आहे. आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात हैदराबादला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल, तसेच -२ गोलपिछाडीही भरून काढावी लागेल. (ATK Mohan Bagan will have to beat Hyderabad)

बांबोळी येथील अॅथलेटिक स्टेडियमवर (Athletic Stadium in Bambolim) बुधवारी (ता. १६) एटीके मोहन बागान व हैदराबाद एफसी (Hyderabad FC) यांच्यात दुसऱ्या टप्प्यातील लढत होईल. त्यावेळी प्रथमच स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी हैदराबादला बरोबरीही पुरेशी ठरेल. हैदराबादचा नायजेरियन (Nigerian) आघाडीपटू बार्थोलोम्यू ओगबेचे याने स्पर्धेत सर्वाधिक १८ गोल केले असून तो गोल्डन बूटसाठी मुख्य दावेदार आहे.

एटीके मोहन बागानने (ATK Mohan Bagan) गतमोसमात अंतिम फेरी गाठली होती, पण त्यांना मुंबई सिटीने (Mumbai City) हरविल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात हैदराबादने त्यांना ३-१ फरकाने हरविले. हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत जमशेदपूरकडून (Jamshedpur) हार पत्करल्यामुळे १५ सामन्यानंतर अपराजित मालिका खंडित झाली.

बुधवारच्या सामन्याविषयी फेरांडो म्हणाले, ``आम्हाला स्वतःच्या रणनीतीकडे लक्ष द्यावे लागेल आणि गोल करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. हा सामना आमच्यासाठी सोपा नक्कीच नाही, परंतु त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. मानसिक कणखरता ही सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करणार आहोत. ''

''पहिल्या टप्प्यातील निकालावर मी आनंदी आहे. पहिल्या तीस मिनिटांत त्यांचा खेळ आमच्यापेक्षा सरस ठरला होता. पण, आम्ही दमदार पुनरागमन केले. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत आणि ते सातत्याने कामगिरी उंचावत आहेत. आमच्याकडे दोन गोलचा लाभ असला तरी ही लढत सोपी नक्की नसेल. अंतिम फेरीत प्रवेश करण्याची आम्हाला अधिक संधी आहे, परंतु हा मार्ग सोपा नाही,'' अशी सावध प्रतिक्रिया हैदराबादचे (Hyderabad) प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी व्यक्त केली.

यंदा मोसमात आमने-सामने

- ५ जानेवारी २०२२ रोजी साखळी फेरीत फातोर्डा येथे २-२ गोलबरोबरी

- ८ फेब्रुवारी २०२२ रोजी बांबोळी येथे साखळी फेरीत एटीके मोहन बागानचा २-१ फरकाने विजय

- १२ मार्च २०२२ रोजी बांबोळी येथे उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात हैदराबाद ३-१ फरकाने विजयी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT