Ronaldinho along with Roberto Carlos during Legends match between FC Barcelona and Real Madrid on Tuesday FC Barcelona/Twitter
क्रीडा

Ronaldinho, the legend: 41 व्या वर्षातही फुटबॉलच्या मैदानावरची जादु कायम

वयाच्या ४१ वर्षात असणाऱ्या रोनाल्डिन्हो (Ronaldinho) ने पुन्हा एकदा फ़ुटबाँल चाहत्यांना एक पर्वणी दिली

Akshay Badwe

बार्सिलोना (FC Barcelona) विरुद्ध रियल माद्रिद (Real Madrid) यांच्यात मंगळवारी झालेल्या 'लिजण्डस' (Legends) सामन्यात ब्राझीलच्या रोनाल्डिन्हो (Ronaldinho) ने सिद्ध करून दाखवलं की वय हा फक्त एक आकडा आहे. वयाच्या ४१ वर्षात असणाऱ्या रोनाल्डिन्हो ने पुन्हा एकदा फ़ुटबाँल चाहत्यांना एक पर्वणी दिली. गोल मारल्यानंतर त्याने आपले विशेष स्टाईलने आनंद देखील साजरा केला. (At 41, Ronaldinho still impressing with his footballing skills)

तेल अवीव मध्ये मंगळवारी झालेल्या प्रदर्शन सामन्यात बार्सिलोना आणि रियल माद्रिद मधील प्रख्यात खेळाडू दिसले. बार्सिलोनाकडून डेको, रिव्हॅल्डो आणि लुइस फिगो तर रियल माद्रिद मधुन रॉबर्टो कार्लोस, इकर कॅसिलास आणि जेव्हियर सॅव्हिओला हे देखील मैदानावर दिसले. अनेक वर्षांनी या दोन्ही संघाचे खेळाडू एकत्र आले. पेड्रो मुनिटिस, अल्फोन्सो पेरेझ आणि रुबेन डी ला रेड च्या जोरावर हा सामना रियल माद्रिदने ३-२ ने जिंकला. हा सामना जरी दोन मोठ्या संघांचा होता मात्र सामन्याचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे रोनाल्डिन्होची खेळी.

रोनाल्डिन्होने आपल्या स्किल्सने समोरच्या संघाची चांगलीच धमछाक उडवली. बार्सिलोनाला पेनल्टी मिळाल्यानंतर रोनाल्डिन्होने गोल मारायची संधी मिळाली आणि त्यानी चाहत्यांना निराश केले नाही. गोल मारल्यानंतर रियल माद्रिदच्या खेळाडूंनी देखील त्याचे अभिनंदन केले.

पाहा रोनाल्डिन्होची जादूगार खेळी

रोनाल्डिन्हो हा सर्वकाळातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. ब्रझील चा रोनाल्डिन्हो हा त्याच्या चपळाई, मैदानावरच्या कौशल्याने पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने एक कल्कप खेळाडू म्हुणुन ओळख असणाऱ्या रोनाल्डिन्हो त्याच्या उत्तीर्ण, दृष्टी आणि प्लेमेकिंगच्या क्षमतेसाठी देखील प्रसिद्ध होता. रोनाल्डिन्हो एक अचूक फिनिशर होता. इतिहासातील सर्वात लोकप्रिय फ्री किक घेणाऱ्या पैकी एक म्हणजे हा सांबा सुपरस्टार.

बार्सिलोनाकडून खेळात असताना त्याने २०७ सामन्यात ९४ गोल मारले आहेत. २०११ साली तो एसी मिलान या क्लबकडून खेळताना दिसला. देशाकडून खेळत असताना रोनाल्डिन्होने १५४ सामन्यात ६२ गोल मारले. रोनाल्डिन्हो भारतात २०१७-१८ ला फुटसॉल स्पर्धेत देखील दिसला होता. भारतात रोनाल्डिन्हो येणार हे कळताच भारतातल्या फुटबॉल प्रेमींनी त्याला बघायला एकच गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

SCROLL FOR NEXT