Asif Khan  Dainik Gomantak
क्रीडा

Fastest ODI Hundred: 33 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास, डिव्हिलियर्सचा वेगवान शतकाचा रेकॉर्ड...

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक लीग 2 च्या 21 व्या फेरीचा सहावा सामना UAE आणि नेपाळ (Nepal vs United Arab Emirates) या संघांमध्ये खेळला गेला.

Manish Jadhav

Fastest ODI Century: आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक लीग 2 च्या 21 व्या फेरीचा सहावा सामना UAE आणि नेपाळ (Nepal vs United Arab Emirates) या संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात 33 वर्षीय खेळाडूने 41 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला आहे. यासोबतच हा खेळाडू सहयोगी देशाकडून सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाजही बनला आहे.

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीचा स्टार फलंदाज आसिफ खानने आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक लीगच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळविरुद्ध केवळ 42 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. वनडेमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.

तसेच, आसिफ खान 38 व्या षटकात फलंदाजीसाठी आला. त्याने 11 षटकार आणि 4 चौकार मारताना नेपाळी गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्याचा स्ट्राइक रेट 240.47 होता. आसिफ खानने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते, पण नंतर त्याने पुढच्या 11 चेंडूत शतक पूर्ण केले.

दुसरीकडे, असिफ खान सहयोगी देशाकडून सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. आसिफच्या खेळीच्या जोरावर यूएईने या सामन्यात 50 षटकात 6 विकेट गमावत 310 धावा केल्या, मात्र या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या (AB de Villiers) नावावर आहे. डिव्हिलियर्सने 2015 साली वेस्ट इंडिजविरुद्ध हा विक्रम केला होता.

त्यानंतर त्याने 147 धावांच्या खेळीत 9 चौकार आणि 16 षटकार मारले. यादरम्यान त्याने केवळ 31 चेंडूत शतक झळकले.

त्याचबरोबर, एबी डिव्हिलियर्स (31 चेंडू), कोरी अँडरसन (36 चेंडू) आणि शाहिद आफ्रिदी (37 चेंडू) यांच्यानंतर आसिफ हा वनडे इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीपूर्वी मोठा धक्का, शुभमन गिलनंतर आणखी 3 खेळाडू रुग्णालयात दाखल; कारण काय?

Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

नावेलीत मांस दुकानात गायीचे कापलेले शिर आढळल्याने खळबळ, दुकानदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

SCROLL FOR NEXT