India Women Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

India Women Cricket Team Playing 11 Asian Games Final: एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत दिमाखात फायनलमध्ये धडक मारली.

Manish Jadhav

India Women Cricket Team Playing 11 Asian Games Final: एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत दिमाखात फायनलमध्ये धडक मारली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अत्यंत आक्रमक आणि दबदबा निर्माण करणारा खेळ केला. सुरुवातीला जपानचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या भारताने उपांत्य सामन्यात बांगलादेशचा पराभव करत फायनलचे तिकीट पक्के केले. आता सुवर्णपदकाच्या महामुकाबल्यात भारताचा सामना श्रीलंका महिला संघाशी होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेला नमवले होते, त्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता हा अंतिम सामना खेळवला जाणार असून भारताचे लक्ष सुवर्णपदक पटकवण्यावर असेल.

भारतीय संघाच्या (Team India) या नेत्रदीपक कामगिरीत गोलंदाजांचा वाटा अत्यंत मोलाचा राहिला आहे. आशिया चषकापासूनच भारतीय गोलंदाजी अत्यंत प्रभावी ठरली असून प्रतिस्पर्धी संघांना पूर्णपणे बॅकफूटवर ढकलण्यात यश आले आहे. नंदिनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड आणि श्रेयंका पाटील यांच्या अचूक गोलंदाजीसमोर विरोधी फलंदाज पूर्णपणे हतबल झालेले दिसले. विशेषतः श्री चरणी हिने आपल्या फिरकीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रीलंका संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आणि ते अनपेक्षित उलटफेर करण्यात पटाईत असल्याने भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे.

फलंदाजीचा विचार केल्यास सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांची जोडी भारताला आक्रमक सुरुवात करुन देत आहे. बांगलादेशविरुद्ध शेफालीने ठोकलेले शानदार शतक भारतीय संघासाठी मोठे बळ ठरले. कर्णधार हरमनप्रीत कौर, गुनालन कमलिनी, भारती फुलमाळी आणि ऋचा घोष यांच्याकडून अंतिम सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. अष्टपैलू दीप्ती शर्मावर पुन्हा एकदा फिरकी आणि फलंदाजीची दुहेरी जबाबदारी असणार आहे. उत्कृष्ट लय पाहता अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये कोणत्याही बदलाची शक्यता नाही.

भारताची संभाव्य प्लेइंग-11

स्मृती मानधना, शेफाली वर्मा, गुनालन कमलिनी, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, श्री चरणी, श्रेयंका पाटील, नंदिनी शर्मा आणि क्रांती गौड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT