IND vs AFG Match Cancelled Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Asian Games 2026, India vs Afghanistan Quarterfinal Match: एशियन गेम्स 2026च्या क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानने आगेकूच करत उपांत्य फेरीत धडक मारली.

Manish Jadhav

Asian Games India vs Afghanistan Asian Games 2026 quarterfinal: एशियन गेम्स 2026च्या क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानने आगेकूच करत उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र, या दोन्ही संघांच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाबाबत एक रंजक आणि विशेष योगायोग पाहायला मिळाला. या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी मैदानात एकही चेंडू खेळावा लागला नाही, कारण त्यांचे उपांत्यपूर्व सामने मुसळधार पावसामुळे रद्द झाले.

निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कवर भारत (India) आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा उपांत्यपूर्व सामना खेळवला जाणार होता. अफगाणिस्तानचा संघ आपले सामने जिंकून या फेरीत पोहोचला होता, तर भारतीय संघाने रँकिंगच्या आधारावर थेट प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांत चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी चाहत्यांना आशा होती. परंतु, पावसामुळे पंचांना एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला. नियमानुसार, भारताची रँकिंग अफगाणिस्तानपेक्षा चांगली असल्यामुळे भारतीय संघाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आणि अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले.

अशीच काहीशी परिस्थिती पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्या सामन्यातही पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी झालेला हा सामनाही पावसामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करावा लागला. पाकिस्तानची रँकिंग हाँगकाँगपेक्षा चांगली असल्यामुळे त्यांनाही थेट उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले. या घडामोडींमुळे एशियन गेम्समध्ये उपांत्य फेरीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, 1 ऑक्टोबरला भारताचा उपांत्य सामना खेळवला जाईल. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी उपांत्य फेरीत आमनेसामने येणार नाहीत, कारण त्यांचे सामने वेगवेगळ्या टप्प्यात आहेत.

आता 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांच्या निकालांवरुन भारत उपांत्य फेरीतील सामना कोणाशी खेळेल हे स्पष्ट होईल. भारताला या स्पर्धेत सुवर्णपदकाचा सर्वात प्रबळ दावेदार मानले जात असून, भारतीय संघ आता पदकापासून फक्त काही पावले दूर आहे. क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता आगामी सामन्यांवर लागून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी म्हापसा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अवमान नोटीस; 15 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT