Asian Games 2023: चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारी (30 सप्टेंबर) भारताची सुवर्ण सुरुवात झाली.
टेनिसमध्ये साकेथ मिनेनी आणि रामनाथन रामकुमार यांच्या रौप्यपदकानंतर मिश्र दुहेरीत रोहन बोपन्नी आणि ऋतुजा भोसले या जोडीने आश्चर्यकारक कामगिरी केली.
बोपण्णा आणि ऋतुजा जोडीने अंतिम सामन्यात चायनीज तैपेई जोडीचा 2-6, 6-3, 10-4 असा पराभव केला. सामना टायब्रेकरपर्यंत गेला आणि अखेरीस भारतीय जोडीने रोमहर्षक विजयाची नोंद केली. या खेळांमधील भारताचे हे 9वे सुवर्णपदक ठरले. तर एकूणच हे 35 वे सुवर्ण ठरले.
दरम्यान, भारतीय जोडीने एन शो लिआंग आणि संग हाओ हुआंग यांचा पराभव करुन देशासाठी या खेळांमध्ये 9 वे सुवर्ण जिंकले. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला पहिल्या सेटमध्ये 2-6 ने पराभवाला सामोरे जावे लागले.
त्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले. दुसरा सेट भारतीय जोडीने जिंकला आणि तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत पोहोचला. यासह भारताने (India) हा सामना टायब्रेकरमध्ये 10-4 असा जिंकून देशाच्या खात्यात सुवर्ण पदक जमा केले.
पदकतालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, भारत अजूनही त्यात चौथ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत एकूण 9 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्यपदक जिंकले आहेत. यजमान चीन 106 सुवर्ण, 65 रौप्य आणि 33 कांस्य पदके जिंकून अव्वल स्थानावर आहे. तर 28 सुवर्णांसह जपान आणि 27 सुवर्णांसह दक्षिण कोरिया (South Korea) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.