Boxer Nikhat Zareen Twitter/ @ANI
क्रीडा

Asian Games 2023: आशियाई क्रिडा स्पर्धेत बॉक्सर निखत जरीनचा जलवा, गुयेन थी टॅमला दिली मात!

Manish Jadhav

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने शानदार सुरुवात केली आहे. स्टार बॉक्सर निखत जरीनने रविवारी (24 सप्टेंबर) व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा पराभव करुन आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकासह शानदार सुरुवात केली. निखतने गुयेन थी टॅमचा 5-0 असा पराभव केला.

निखत जरीनने प्री-क्वार्टर फायनल गाठली

निखत जरीनने महिलांच्या 50 किलो गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत गुयेन थी टॅमचा पराभव करुन आगेकूच केली. प्री क्वार्टरमध्ये जरीनचा सामना दक्षिण कोरियाच्या चोरोंग बाकशी होणार आहे.

27 वर्षीय निखत जरीनने पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. तिने तिसऱ्या फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्याला शानदार बॉक्सिंगने (Boxing) पराभूत केले आणि पुढील फेरीत प्रवेश केला. निखतच्या उत्कृष्ट बॉक्सिंगमुळे, गुयेनला पहिल्याच फेरीत 30 सेकंदात दोनदा 'आठ काउंट' द्यावे लागले.

निखत म्हणाली...

विजयानंतर निखत म्हणाली की, “मला या सामन्यात एकतर्फी विजयाची अपेक्षा नव्हती, पण माझी योजना तशी होती. माझी योजना पहिल्या दोन फेऱ्या एकमताने जिंकण्याची होती जेणेकरुन मी तिसऱ्या फेरीत रिलॅक्स करु शकेन.”

ऑलिम्पिकमधील (Olympics) कोट्यामध्ये स्थान मिळवण्याबाबत बोलताना निखत म्हणाली की, 'मी प्रथम पॅरिससाठी पात्र होण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.' निखत पुढे असेही म्हणाली की, “मी प्रथम पात्रतेवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यानंतर मी अंतिम आणि सुवर्णपदकाचा विचार करेन.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT