Asian Games 2023: आशियाई क्रिडा स्पर्धेचे धूमधडाक्यात उद्घाटन, पाहा ओपनिंग सेरिमनीची झलक

Asian Games 2023: आशियाई गेम्स 2023 ला शनिवारी (23 सप्टेंबर) चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या उद्घाटन समारंभाने अधिकृतपणे सुरुवात झाली.
Asian Games 2023
Asian Games 2023Dainik Gomantak

Asian Games 2023: आशियाई गेम्स 2023 ला शनिवारी (23 सप्टेंबर) चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या उद्घाटन समारंभाने अधिकृतपणे सुरुवात झाली. 80 हजार प्रेक्षक क्षमतेचे बिग लोटस म्हणून ओळखले जाणारे हे स्टेडियम प्रामुख्याने फुटबॉल स्टेडियम म्हणून 2018 मध्ये बांधले गेले.

आशियाई गेम्सचा उद्घाटन समारंभ IST संध्याकाळी 5:30 वाजता सुरु झाला आहे आणि त्याचे थेट स्ट्रीमिंग आणि प्रसारण भारतात उपलब्ध असेल.

या सोहळ्याला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत चीनचा इतिहास आणि त्याची उपलब्धी दाखवण्यात आली. नेत्रदीपक लेझर शोने यावेळी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

दरम्यान, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व देशांनी आपापल्या ध्वज धारकांच्या नेतृत्वाखाली या महा उद्घाटनाच्या वेळी परेडला सुरुवात केली.

परेड सुरु करणारा पहिला देश अफगाणिस्तान (Afghanistan) होता, त्यानंतर बहारीन, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई दारुसलाम, कंबोडिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, हाँगकाँग, चीन, भारत, इंडोनेशिया, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण, इराक.

Asian Games 2023
Asian Games 2023: चीनने भारताच्या 3 खेळाडूंना प्रवेश नाकारल्यानंतर क्रीडामंत्र्यांनी उचलले मोठे पाऊल

दुसरीकडे, 39 स्पर्धांसाठी 655 खेळाडूंच्या सर्वात मोठ्या तुकडीसह भारत हांगझोऊमध्ये पोहोचला आहे. हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि विश्वविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक होते.

2018 मध्ये झालेल्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा ध्वजवाहक होता. दरम्यान, यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी आहे.

Asian Games 2023
Asian Games 2023: भारतीय फुटबॉल टीमची सुरुवात पराभवाने, चीनने मिळवला दणदणीत विजय

टेबल टेनिसमध्ये पुरुष संघाचा शानदार विजय

टेबल टेनिसमध्ये भारतीय पुरुष संघाने शानदार सुरुवात करत ताजिकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये मानवने 11-8, 11-5, 11-8 असा सामना जिंकून भारताला आघाडी मिळवून दिली.

यानंतर मानुष शाहने सुलतानोवचा 13-11, 11-7, 11-5 अशा फरकाने पराभव केला. अखेरीस, भारताच्या हरमीत देसाईने इस्माइला जोडाविरुद्ध तिसऱ्या गेममध्ये 11-1, 11-3, 11-5 अशा फरकाने जिंकला आणि टीम इंडियाला (Team India) पहिल्या फेरीत सहज विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने अंतिम 16 मध्ये स्थान मिळवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com