Chirag Shetty & Satwik Sairaj  Twitter/ @BAI_Media
क्रीडा

Asian Championships 2023: सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीच्या जोडीने रचला इतिहास, 58 वर्षांनंतर भारताला मिळवून दिलं 'सुवर्ण'

Asian Championships 2023: सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे.

Manish Jadhav

Asian Championships 2023: सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे.

आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ही स्टार दुहेरी जोडी दिनेश खन्ना नंतर पहिली भारतीय ठरली आहे.

या दोघांनी रविवारी मलेशियन जोडी य्यू सिन/टीओ ई यी यांचा 16-21, 21-17, 21-19 असा पराभव करुन 58 वर्षांची प्रतीक्षा संपवली.

आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी ठरली.

दरम्यान, 2022 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्यांनी सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले.

पहिला सेट गमावल्यानंतर त्यांनी उत्कंठावर्धक अंतिम फेरीत ओंग येव सिन आणि तेओ ई यी या मलेशियाच्या (Malaysia) जोडीचा 21-16, 17-21, 19-21 असा पराभव केला.

कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा खन्ना हा एकमेव भारतीय आहे, त्याने 1965 मध्ये लखनऊमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत थायलंडच्या सांगोब रत्नुसोर्नचा पराभव करुन ही कामगिरी केली होती. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

दुसरीकडे, या वर्षाच्या सुरुवातीला स्विस ओपन जिंकणारी भारतीय जोडी ली यांग आणि वांग ची-लिन या तैवानच्या (Taiwan) जोडीला पराभूत करुन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही जोडी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी देखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT