Tilak Varma Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: तिलक वर्माची टीम इंडियात सरप्राईज एंट्री! चौथ्या क्रमांकाबाबत स्पर्धा वाढली; वर्ल्ड कपमध्ये...

Tilak Varma: आशिया चषक स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. संघाची घोषणा होताच आता सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.

Manish Jadhav

Tilak Varma: आशिया चषक स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. संघाची घोषणा होताच आता सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.

टीम इंडियामध्ये एकूण 17 नावांची घोषणा करण्यात आली. संजू सॅमसनला बॅकअप खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. सॅमसन मुख्य नावांमध्ये नाही.

दरम्यान, टीम इंडियात (Team India) काही खेळाडू दुखापतीनंतर परतले असून तिलक वर्माची सरप्राईज एंट्री झाली आहे. टीम इंडियात तिलकचा समावेश करुन व्यवस्थापनाने मोठे संकेत दिले आहेत. अलीकडची कामगिरी लक्षात घेता तिलकचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूची समस्या कायम आहे. युवराज सिंगनंतर या क्रमांकावर कायमस्वरुपी कोणताही खेळाडू आलेला नाही.

या क्रमांकावर श्रेयस अय्यरने काही प्रमाणात चांगली कामगिरी केली असली, तरी तोही तो युवराज सिंगसारखा जलवा दाखवू शकलेला नाही.

दुसरीकडे, अय्यर दुखापतीतून परतला आहे, त्याच्याशिवाय केएल राहुलही (KL Rahul) दुखापतीतून परतला आहे. दोन्ही खेळाडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम आहेत. या दोघांच्या फिटनेसमध्ये काही अडचण निर्माण झाली तर तिसरा पर्याय म्हणून तिलक वर्माकडे पाहिले जाऊ शकते.

टीम इंडियात तिलक वर्माचा समावेश करण्यामागे चौथ्या क्रमांकावर अफलातून फलंदाजी करणारा खेळाडू शोधणे आहे. आशिया चषकानंतर विश्वचषक होणार असून इथून टीम इंडियाच्या उणिवा कळतील.

तिलकला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग बनवले जाऊ शकते. आशिया चषक संघात आता फेरफार होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.

तसेच, तिलक वर्मा डाव्या हाताने खेळतो, जो मधल्या फळीतही चांगला कॉम्बिनेशन करतो. अशा परिस्थितीत तो अय्यर आणि केएल राहुलनंतर चौथ्या क्रमांकासाठीचा खेळाडू ठरु शकतो.

अलीकडेच अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी तिलकला चौथ्या क्रमांकासाठी वनडे संघात आणावे, असे म्हटले होते. तिलक वर्माने भारतीय संघासाठी आतापर्यंत 7 टी-20 सामने खेळले असून अचानक त्याचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने टी-20 मध्ये पदार्पण करुन प्रभावित केले.

याशिवाय, तिलकने 7 टी-20 सामने खेळून भारतीय संघासाठी 174 धावा केल्या आहेत. 51 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या स्ट्राइक रेटबद्दल बोलायचे झाल्यास, तो 138 पेक्षा जास्त आहे.

यंदाचा एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार असून भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय तिलकला आहे. आयपीएलमध्ये त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. अशाप्रकारे आशिया चषक संघातून तो विश्वचषक स्पर्धेपर्यंतचा प्रवास करु शकतो असे म्हणता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT