Team India Virat Kohli Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियासमोर 24 तासांच्या आत श्रीलंकेचं आव्हान, काय सांगतो हवामान अंदाज?

Pranali Kodre

Asia Cup 2023 Super Four India vs Sri Lanka, Rain Updates:

आशिया कप 2023 स्पर्धेच सुपर फोरची फेरी सुरू झाली असून भारताने पाकिस्तानविरुद्ध राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी (11 सप्टेंबर) 228 धावांनी विजय मिळवला. यानंतर आता 24 तासांच्या आतच मंगळवारी (12 सप्टेंबर) भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध सामना रंगणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर फोरमधील दुसरा सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर सामना रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

तथापि, कोलंबोमध्येच झालेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. त्याचमुळे रविवारी 24.1 षटकांचा खेळ झाल्यानंतर उर्वरित खेळ सोमवारी म्हणजेच राखीव दिवशी झाला. सोमवारीही पावसाचा काही काळ व्यत्यय आला होता, त्यामुळे आता श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यातही पाऊस अडथळा आणणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान, मंगळवारीही कोलंबोमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सामन्यात अडथळा येऊ शकतो.

AccuWeather च्या अंदाजानुसार मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहाणार आहे. तसेच दुपारच्या वेळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कदाचीत सामना सुरू होण्यासाठीही उशीर होऊ शकतो. तसेच पाऊस खूप वेळ झाला नाही, तरी वातावरण मात्र ढगाळ असणार आहे.

राखीव दिवस नाही

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या सामन्याप्रमाणे भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यासाठी राखीव दिवसाची सोय नाही. सुपर फोरमधील केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्यात आला होता. बाकी कोणत्याच सामन्याला राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. आता केवळ अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असेल.

सुपर फोरमधील केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्याबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया दिली असली, तरी बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डांनी या निर्णयाला सहमती दर्शवली होती. याबद्दल त्यांनी ट्वीटही केले होते.

भारतीय संघात होणार बदल?

भारतीय संघाला 24 तासांच्या आतच पुन्हा मैदानात उतरावे लागणार असल्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते, कारण हे दोघांनीही मोठ्या दुखापतीतून पुनरागमन केले आहे. अशात खबरदारी म्हणून त्यांच्याऐवजी मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव किंवा श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT