IND vs PAK: पाकिस्तानला पराभवानंतर जबरदस्त धक्का! दोन प्रमुख खेळाडू बाहेर होण्याच्या वाटेवर, तर...

Pakistan Cricket team: भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघात अचानक दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
Pakistan Cricket Team
Pakistan Cricket TeamDainik Gomantak

Injury scare for Pakistan Cricket Team during Asia Cup 2023:

सोमवारी (11 सप्टेंबर) पाकिस्तानला आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सुपर फोरच्या सामन्यात तब्बल 228 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाबरोबरच पाकिस्तानला मोठे धक्केही बसले आहेत.

या सामन्यादरम्यान पाकिस्तानचे प्रमुख वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांना छोट्या दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून सुरु होणारी वनडे वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेता या दोन्ही गोलंदाजांच्या बाबतीत जोखीम न घेण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

दरम्यान, रौफने तर या सामन्यात केवळ 5 षटकेच गोलंदाजी केली. तर नसीम शाहने 9.2 षटके गोलंदाजी केली.

Pakistan Cricket Team
व्ह्युवरशिपमध्येही IND vs PAK सामन्याचा विक्रम! इतिहासात पहिल्यांदाच 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिली मॅच

दोन खेळाडूंचा समावेश

दरम्यान, या दोघांनाही दुखापत झाल्याने त्यांना कव्हर म्हणून वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी आणि झमान खान यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

पण पाकिस्तान संघ व्यवस्थापनाला आशा आहे की नसीम आणि रौफ गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या सुपर फोर सामन्यापूर्वी तंदुरुस्त व्हावेत. पण असे असले तरी त्यांनी अधिक जोखीम न घेण्याचे ठरवले आहे.

खबरदारीचा उपाय

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबद्दल सांगितले की 'पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा फिटनेस आणि आरोग्य लक्षात घेता फक्त खबरदारी घेण्यात आली आहे. त्या दोघांवरही संघाचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असेल.'

'जर हॅरिस किंवा नसीम यांना पुढील सात दिवसांसाठी क्रिकेटला मुकावे लागले, तर संघव्यवस्थापन आशियाई क्रिकेट संघटनेचा तांत्रिक समितीकडे त्यांच्या बदली खेळाडूसाठी विनंती करेल.'

Pakistan Cricket Team
IND vs PAK: KL राहुलच्या शतकाचं कौतुक करताना वेंकटेश प्रसादला आठवला धोनी, म्हणाला...

भारताचा विजय

दरम्यान, भारताविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे, तसेच श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या तिन्ही संघांचे २ गुण आहेत. मात्र नेट रनरेटनुसार गुणतालिकेतील स्थान निश्चित केले गेले आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 2 बाद 356 धावा उभारल्या. 

त्यानंतर 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 32 षटकात 8 बाद 128 धावा केल्या. त्यानंतर नसीम आणि रौफ दुखापतग्रस्त असल्याने फलंदाजीला येऊ शकणार नव्हते. त्यामुळे सामना तिथेच थांबवण्यात आला आणि भारताने विजय मिळवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com