India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: पाकिस्तानने जिंकला टॉस, भारतीय संघात केएल राहुल-बुमराहचे कमबॅक, तर 'हे' खेळाडू बाहेर

Asia Cup 2023: पाकिस्तानने भारताविरुद्ध आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर फोरच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023 Super Four India vs Pakistan Playing XI:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोर फेरी सुरू झाली असून रविवारी (10 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान संघात सामना होत आहे. हा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने दोन मोठे बदल केले आहेत. श्रेयस अय्यरला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने त्याच्या जागेवर केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. याबद्दल नाणेफेकीवेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माने माहिती दिली.

तसेच मोहम्मद शमीच्या जागेवर जसप्रीत बुमराहला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे केएल राहुल आणि बुमराहे हे दोघेही या सामन्यातून पुनरागमन करताना दिसतील.

त्यामुळे केएल राहुल आणि बुमराहे हे दोघेही या सामन्यातून पुनरागमन करताना दिसतील. केएल राहुलला आयपीएल २०२३ स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती. त्याच्या मांडीवर नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यामुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. त्याला आशिया चषकातील साखळी फेरीचे सामनेही खेळता आले नव्हते. पण आता तो दुखापतीतून पूर्ण सावरला असून पुन्हा भारतीय संघाकडून खेळण्यास सज्ज झाला आहे.

तसेच पाकिस्तानविरुद्ध साखळी फेरीतील सामन्यानंतर बुमराह त्याच्या मुलाच्या जन्मासाठी भारतात परतला होता. त्यामुळे तो नेपाळविरुद्धचा सामना खेळला नव्हता. पण पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोरच्या सामन्यापूर्वी तो पुन्हा संघात परतला आणि आता पुनरागमन करताना दिसणार आहे.

दरम्यान रविवारी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी विजयी संघच कायम केला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध खेळलेला 11 जणांचाच संघ भारताविरुद्धही खेळताना दिसणार आहे.

तथापि, या सामन्यावरील पावसाचे सावट लक्षात घेता राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की  पाकिस्तानचा हा सुपर फोर फेरीतील दुसरा सामना आहे, तर भारताचा पहिला सामना आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे.

तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीवेळी सामना झाला होता. मात्र, पहिल्या डावानंतर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.

सुपर फोरसाठी असे आहेत 11 जणांचे संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आघा, इफ्तिखान अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहिम अश्रफ, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

Lakshmi Narayanan Rajyog 2026: शुक्र-बुध युतीचा महाचमत्कार! लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावाने 'या' राशींवर होणार पैशाचा वर्षाव; संपत्तीत होणार बंपर वाढ

BSNL Tag Block Theft: 'बीएसएनएल'ला चोरांचा दणका, सासष्टीत टॅग ब्लॉकची चोरी; दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत

Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

SCROLL FOR NEXT