Tilak Varma ODI Debut Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: तिलक वर्माचे पदार्पण, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल 5 बदल

Asia Cup 2023: बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल ५ बदल केले आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023, Super Four, India vs Bangladesh, Playing XI: आशिया चषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सुपर फोर फेरीतील सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात शुक्रवारी (15 सप्टेंबर) रंगणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होत असून या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले असल्याचे माहिती कर्णधार रोहित शर्माने दिली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात तिलक वर्मालाही संधी मिळाली आहे. त्यामुळे तिलक वर्माचे वनडे पदार्पण झाले आहे.

तसेच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या गेल्या सामन्यात बेंचवर बसलेल्या सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांना बांगलादेशविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

याशिवाय विराट कोहली, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

त्याचबरोबर बांगलादेशकडूनही तन्झिम हसन साकिब या २० वर्षीय वेगवान गोलंदाजाचे पदार्पण झाले आहे. त्याचबरोबर बांगलादेशनेही ज्या खेळाडूंना खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही, त्यांना या सामन्यात खेळण्याची संधी दिली आहे.

दरम्यान, या सामन्याचा स्पर्धेवर फारसा परिणाम होणार नाही, कारण भारतीय संघाने आधीच अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला आहे. तसेच बांगलादेश अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. त्याचमुळे वर्ल्डकपपूर्वी दोन्ही संघ या सामन्यातून आपली बेंच स्ट्रेंथ आजमावून पाहात आहेत.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

  • बांगलादेश - लिटन दास (यष्टीरक्षक), तांझिद हसन, अनामूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Javier Siverio: 'हमखास गोल नोंदविणारा खेळाडू'! स्पॅनिश हावियर FC Goa टीममध्ये; प्रशिक्षक मार्केझनी केले कौतुक

Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्यात काणकोण नकोच! निर्णय लादल्यास रस्त्यावर उतरणार'; स्थानिक आक्रमक

Atal Patrol Ship: खोल समुद्रात स्वदेशी 'अटल' घालणार गस्त! गोवा शिपयार्डतर्फे 6वे द्रुतगती जहाज; आणखी 12 जहाजांचे जलावतरण होणार

Goa Job Scam: 20 लाख घेतात, अमेरिकेत नोकरीचे आश्वासन देतात; गोव्यातील तरुणांची होतेय फसवणूक, आमोणकरांनी मांडली व्यथा

Goa University: ‘चोरीचा अहवाल फुटला कसा?’ विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या बैठकीत 4 तास खल

SCROLL FOR NEXT