Asia Cup 2023, Super Four, India vs Bangladesh | Shakib Al Hasan Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: शाकिब-हृदोयच्या फिफ्टीने सावरलं, बांगलादेशचं शेपूटही वळवळलं, भारतासमोर 266 धावांचे आव्हान

Pranali Kodre

Asia Cup 2023, Super Four, India vs Bangladesh: आशिया चषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सुपर फोर फेरीतील सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात शुक्रवारी (15 सप्टेंबर) होत आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी घेतला आणि बांगलादेशला सुरुवातीला मोठे धक्के दिले.

बांगलादेशकडून तान्झिद हसन आणि लिटन दास हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. पण त्यांना फार काही करता आले नाही. लिटन दासला शुन्यावरच मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात, तर तान्झिद हसनला 13 धावांवर शार्दुल ठाकूरने चौथ्या षटकात त्रिफळाचीत केले.

त्यानंतर शार्दुलने अनामुल हकचाही (4) अडथळा सहाव्या षटकात दूर केला. त्यामुळे बांगलादेशची अवस्था 3 बाद 28 धावा अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराजने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण चांगल्या सुरुवातीनंतरही मेहदी हसन मिराज 13 धावांवर अक्षर पटेलविरुद्ध खेळताना रोहित शर्माकडे झेल देत बाद झाला.

मात्र यानंतर शाकिबला तौहिद हृदोयने दमदार साथ दिली. शाकिबने फिरकी गोलंदाजीविरुद्ध मोठे फटकेही खेळले. दरम्यान, त्यांच्यात शतकी भागीदारीही झाली. यादरम्यान शाकिबने अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, त्यांची 101 धावांची भागीदारी झाली असताना शाकिबला ३४ व्या षटकात शार्दुल ठाकूरने त्रिफळाचीत करत भारताला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला.

शाकिबने 85 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 80 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर लगेचच शमीम हुसैनला रविंद्र जडेजाने 1 धावेवरच पायचीत केले. त्यानंतर हृदोयला नसुम अहमदने साथ दिली होती. मात्र, हृदोय अर्धशतकानंतर बाद झाला. त्याला शमीने 54 धावांवर बाद केले.

त्यानंतरही नसूम अहमद आणि मेहदी हसन यांनी 45 धावांची 8 व्या विकेटसाठी भागीदारी करत बांगलादेशला 230 धावांचा टप्पा पार करून दिला. पण नसूम अहमदला अर्धशतक करण्यासाठी 6 धावांची गरज असतानाच प्रसिद्ध कृष्णाने त्याला 44 धावांवर त्रिफळाचीत केले.

मात्र यानंतर मेहदी हसनने पदार्पणवीर तान्झिम हसन साकिबसह बांगलादेशला 260 धावांचा टप्पा पार करून दिला. मेहदी हसन 29 धावांवर आणि तान्झिम हसन साकिब 14 धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 265 धावा केल्या.

भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT