Glenn Maxwell: मॅक्सवेल झाला 'बापमाणूस'! पत्नी विनीने दिला मुलाला जन्म, नावाचाही केला खुलासा

Glenn Maxwell Son: ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली असून त्यांनी फोटोही शेअर केला आहे.
Glenn Maxwell Son
Glenn Maxwell SonDainik Gomantak

Glenn Mazwell and wife Vini Raman blessed with Son:

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या आयुष्यात आता एका चिमुकल्याचा प्रवेश झाला आहे. मॅक्सवेल आणि त्याची पत्नी विनी रमण एका मुलाचे आई-वडील झाले आहेत. त्यांना 11 सप्टेंबर रोजी पुत्र प्राप्ती झाली आहे. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत विनीने माहिती दिली आहे.

विनी प्रेग्नंट असल्याचे यापूर्वीच तिने सांगितले होते. आता त्यांना ११ सप्टेंबरला मुलगा झाल्याची घोषणा तिने एक फोटो शेअर करत दिली आहे. याच मॅक्सवेल आणि विनीच्या नवज्यात मुलाची झलक पाहायला मिळत आहे. तसेच त्या दोघांचे हातही दिसत आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने मुलाच्या जन्म तारखेचा आणि नावाचा खुलासा केला आहे. तिने लिहिले की '11.09.2023. लोगन मॅव्हरिक मॅक्सवेल.' तिच्या कॅप्शनवरून लक्षात येते की विनी आणि मॅक्सवेल यांनी त्यांच्या मुलाचे नाव लोगन मॅव्हरिक असे ठेवले आहे.

Glenn Maxwell Son
IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू झाला बाप, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

भारतीय पद्धतीने झालेले डोहाळजेवण

काही दिवसांपूर्वीच विनीचे भारतातील पारंपारिक तमिळ पद्धतीने डोहाळजेवण करण्यात आले होते. त्याचे अनेक फोटो विनीने सोशल मीडियावरही शेअर केले होते. पेशाने फार्मासिस्ट असलेली विनी भारतीय वंशाची आहे. पण ती आणि तिचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वीच ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत.

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण यांचे लग्नही भारतीय आणि ख्रिश्चन पद्धतीने 2022 साली झाले होते. त्यांचे लग्नातील फोटोही चांगलाच व्हायरल झाले होते. आता हे दोघेही आई-बाबा झाले आहेत.

Glenn Maxwell Son
IND vs SL: प्लेइंग इलेव्हनमध्ये नसूनही चमकला 'सूर्या', श्रीलंकेविरुद्ध विजयात असा उचलला मोठा वाटा

मॅक्सवेल दुखापतीमुळे झालेला संघातून बाहेर

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. पण या मालिकेतून मॅक्सवेल घोट्याला दुखापतीमुळे बाहेर झाला होता. त्याला सरावादरम्यान दुखापत झाली होती.

तथापि, या मालिकेनंतर वनडे मालिकेपूर्वी तो त्याच्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतणार होता. मात्र या दुखापतीमुळे तो संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौराच खेळला नाही.

भारताविरुद्ध खेळणार मॅक्सवेल

मॅक्सवेल दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळला नसला, तरी आगामी भारतीय दौऱ्यात खेळताना दिसू शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर वनडे वर्ल्डकपही भारतात होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com