India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: पाकिस्तानची सुपर फोरमध्ये धडक, आता लक्ष भारत-नेपाळ सामन्याकडे, वाचा समीकरण

India vs Pakistan: भारताविरुद्ध सामना शनिवारी रद्द झाल्याने पाकिस्तानने आशिया चषकातील सुपर फोरमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता भारतासमोरील समीकरण कसे असेल, जाणून घ्या.

Pranali Kodre

Pakistan into the Asia Cup 2023 Super Four, now know the equations for India and Nepal:

शनिवारी (2 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पावसाचेच वर्चस्व राहिले. या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव संपल्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने पुढे खेळ होऊ शकला नाही आणि सामनाधिकाऱ्यांना सामना रद्द झाल्याचे घोषित केले.

त्यामुळे दोन्ही संघांना या सामन्याचा एक - एक गुण वाटून देण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानने सुपर फोर फेरीतील आपले स्थान मात्र पक्के केले आहे. कारण पाकिस्तानने नेपाळविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात 238 धावांनी विजय मिळवला होता.

त्यामुळे पाकिस्तानचे 3 गुण झाले आहेत. त्यामुळे सध्या अ गटात पाकिस्तान अव्वल क्रमांकावर आहेत. तसेच त्यांचे दोन्ही साखळी सामने पूर्ण झाले आहेत.

तसेच अ गटात असलेल्या भारताकडे 1 गुण आहे, तर नेपाळच्या खात्यात शुन्य गुण आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातील साखळी फेरीचा एक सामना बाकी आहे. त्यामुळे आता 4 सप्टेंबर रोजी भारत आणि नेपाळ संघात होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणारा संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करणार आहे, तर पराभूत संघाचे आव्हान इथेच संपेल.

कारण जर भारताने विजय मिळवल्यास भारताचे ३ गुण होतील, तर नेपाळचे शुन्यच गुण राहतील आणि भारत सुपर फोरमध्ये जाईल. पण जर नेपाळने विजय मिळवला, तर त्यांना 2 गुण मिळतील, तर भारताचा एकच गुण राहिल आणि नेपाळ सुपर फोरमध्ये प्रवेश करेल.

त्याचबरोबर जर भारत आणि नेपाळ यांच्यातील सामनाही रद्द झाला किंवा बरोबरीत सुटला, तर भारताला फायदा होईल. कारण तसे झाल्यास भारत आणि नेपाळ यांना विभागून एक-एक गुण मिळेल. त्यामुळे भारताचे एकूण 2 गुण होतील, तर नेपाळकडे मात्र एकच गुण असेल. त्यामुळे भारतीय संघ अधिक गुणांमुळे पुढच्या फेरीत जाईल.

दरम्यान, भारत आणि नेपाळ यांच्यातील सुपर फोरमध्ये प्रवेश करणारा संघ पाकिस्तानविरुद्ध 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे सामना खेळणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द

शनिवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द होण्यापूर्वी भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या होत्या. भारताकडून इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी अर्धशतके केली.

इशानने 82 धावांची आणि हार्दिकने 87 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर सामना रद्द झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT