PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Jan Dhan Accounts In Goa: प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत (पीएम जनधन) राज्‍यातील विविध बँकांत आतापर्यंत २,३५,२०० खाती उघडण्‍यात आली असून, त्‍यात २४०.८० कोटींची रक्कम आहे.
Jan Dhan Accounts In Goa
Canara bank tops Jan Dhan scheme in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत (पीएम जनधन) राज्‍यातील विविध बँकांत आतापर्यंत २,३५,२०० खाती उघडण्‍यात आली असून, त्‍यात २४०.८० कोटींची रक्कम आहे. गोमंतकीयांनी योजनेअंतर्गत सर्वाधिक खाती कॅनरा बँकेत उघडल्‍याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

केंद्र सरकारने २८ ऑगस्ट २०१४ रोजी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली. योजनेअंतर्गत शून्य रुपयांत बँकेत खाते उघडता येते, खाते धारकाला मोफत रुपे डेबिट कार्ड आणि विमा संरक्षणही मिळते. रुपे कार्डवर दोन लाख रुपयांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण मिळते आणि ३० हजार रुपयांचे जीवन विमा संरक्षण मिळते.

Jan Dhan Accounts In Goa
Goa Cooperative Bank: 21 वर्षांनंतर मोठा निकाल! 40 लाखांच्या कथित कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सर्व 7 आरोपी निर्दोष; पोलिसांच्या ढिसाळ तपासावर न्यायालयाचे ताशेरे

खाते व्यवस्थित चालवल्यास खात्यातून १० हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. दरम्‍यान, गोमंतकीय जनतेने या योजनेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. त्‍यामुळे बँकांतील खात्‍यांची संख्‍या २.३५ लाखांवर पोहोचली असून, त्‍यात २४० कोटींपेक्षा अधिक रक्कम असल्‍याचे दिसून येते. सर्वाधिक खाती रक्‍कम कॅनरा बँकेत असल्‍याचेही आकडेवारीतून स्‍पष्‍ट होते.

उघडलेली खाती व रक्कम

बँकेचे नाव खाती रक्कम (कोटींत)

बडोदा बँक १७,८६१ २५.७३

बँक ऑफ इंडिया १९,०६६ २४.६७

बँक ऑफ महाराष्‍ट्र ९,६१७ ८.९९

कॅनरा बँक ६४,०१३ ९३.८४

इंडियन ओव्‍हरसीस ३४,७७० ३३.९२

पंजाब व सिंध ८१८ ०.१८ लाख

पंजाब नॅशनल ७,०८५ ३.५३

एसबीआय १४,४९० ९.७२

युको बँक ३,९५३ २.७२

युनियन बँक ३५,१०१ २२.३२

सेंट्रल बँक ९,९१८ ५.३२

इंडियन बँक ३,८३५ २.२०

इतर १४,६७१ ७.६५

एकूण २,३५,२०० २४०.८०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com