Virat Kohli | Rohit Sharma | Shaheen Shah Afridi  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: शाहिन आफ्रिदीने दाखवला इंगा, रोहित-विराट क्लिन-बोल्ड, तर अय्यरही पुनरागमनात फेल

Asia Cup 2023: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. विराट आणि रोहित स्वस्तात बाद झाले.

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Pakistan Shaheen Shah Afridi clean Bowled Rohit Sharma-Virat Kohli:

आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी सामना होत आहे. कँडीमधील पाल्लेकेले स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात निराशाजनक राहिली आहे.

या सामन्यात भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजीला उतरले. या दोघांनी संयमी फलंदाजी करत चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पाचवे षटक सुरु असताना पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबला.

यानंतर जेव्हा पुन्हा सामना सुरु झाला, त्यानंतर मात्र रोहित शाहिन शाह आफ्रिदीविरुद्ध खेळताना संघर्ष करताना दिसला. याचाच फायदा घेत आफ्रिदीने रोहितला बाद केले.

पाचव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर आफ्रिदीने टाकलेला वेगवान चेंडूचा सामना करताना रोहित चूकला आणि त्रिफळाचीत झाला. त्यामुळे तो २२ चेंडूत २ चौकारांसह ११ धावा करून माघारी परतला.

यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. त्याने गिलला साथ देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, एक शानदार चौकारही त्याने ठोकला. मात्र, ७ व्या षटकाचा तिसरा चेंडू आफ्रिदीने आखुड टप्प्याचा टाकला, ज्यावर विराटने ऑफ-साईडला शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो या प्रयत्नांत त्रिफळाचीत झाला. विराटने ७ चेंडूत ४ धावा केल्या.

यानंतर गिलने श्रेयस अय्यरला साथीला घेतले होते. ते दोघेही भारताचा डाव पुढे नेला. पण, श्रेयसलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. १० व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर हॅरिस रौफने श्रेयसला माघारी धाडले. श्रेयसचा झेल फखर जमानने घेतला.

त्यामुळे भारतीय संघावर १० षटकांच्या आतच ३ विकेट्स गमावण्याची नामुष्की ओढावली. विशेष म्हणजे श्रेयसचा हा पुनरागमनाचा सामनाही आहे.

तो मार्चपासून दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नव्हता. पण पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तो भारतीय संघाकडून पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच मैदानात उतरला. दरम्यान, १० षटकांनंतर भारतीय संघाने ३ बाद ४८ धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

Goa Road Safety: '20 कोटी' दंड वसूल, मग अपघातप्रवण क्षेत्रे का सुधारली नाहीत? आलेमाव यांचा विधानसभेत सवाल

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

SCROLL FOR NEXT