India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

पावसाचे सावट असलेल्या IND vs PAK सामन्याला राखीव दिवसाचा दिलासा, पण काय आहेत नियम?

Asia Cup: रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषक 2023 स्पर्धेचा सुपर फोरचा सामना रंगणार असून यावर पावसाचे सावट असणार आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023, India vs Pakistan, Colombo Rain Weather Updates, reserve day rules:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोर फेरी सुरू झाली असून रविवारी (10 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, श्रीलंकेत पावसाळा असल्याने या सामन्यावरही पावसाचे सावट असणार आहे.

मिळालेल्या माहिती नुसार रविवारी सकाळी ऊन पडले होते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, असे असले तरी या सामन्यावरील पावसाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. कारण AccuWeather नुसार संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, एमइटी विभागाने कोलंबोमध्ये शनिवार आणि रविवारी पावसाची दाट शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला होता.

मात्र, शनिवारी पावसाचा व्यत्यय न येता श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना कोलंबोमध्ये पार पडला. तसेच शुक्रवारी संध्याकाळपासून कोलंबोत फारसा पाऊस झाला नसल्याचे अनेक स्थानिकांनीही सोशल मीडियावर सांगितले होते.

त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा असेल की भारत आणि पाकिस्तान सामनाही पावसाच्या व्यत्ययाशिवाय पार पडावा.

राखीव दिवसाची व्यवस्था

काही दिवसांपूर्वीच आशियाई क्रिकेट संघटनेने घोषित केले होते की रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर फोर फेरीत केवळ या एकाच सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्याच रविवारी पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर सोमवारी हा सामना राखीव दिवशी पूर्ण केला जाऊ शकतो. पण सोमवारीही पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर सामना रद्द म्हणून घोषित केला जाऊ शकतो.

दरम्यान, सामनाधिकाऱ्यांकडून रविवारीच हा सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पावसामुळे षटके कमी करूनही सामना रविवारीच पूर्ण केला जाऊ शकतो. पण तरी निकाल लागण्यासाठी दोन्ही संघात किमान 20-20 षटकांचा तरी सामना होणे गरजेचे असणार आहे.

मात्र, जर पावसामुळे 20-20 षटकांचाही सामना होऊ शकला नाही, तर सोमवारी राखीव दिवशी हा सामना होईल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की राखीव दिवशी नव्याने सामना सुरू होणार नाही, रविवारी जिथे सामना थांबला तिथूनच सामना पुढे खेळवला जाईल. तसेच जर रविवारी खेळच होऊ शकला नाही, तर सोमवारी पूर्ण सामना खेळवण्याचा प्रयत्न असेल.

दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीवेळी सामना झाला होता. मात्र, पहिल्या डावानंतर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT