IND vs PAK: भारताविरुद्धच्या Super-4 सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग-11 जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Asia Cup 2023: रविवारी भारताविरुद्ध आशिया चषकातील सुपर फोरच्या सामन्यासाठी पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
Pakistan Cricket Team
Pakistan Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Announced Playing XI Against India for Asia Cup 2023 Super Four Match:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोर फेरी सुरू झाली असून रविवारी (10 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हनची घोषणा एक दिवस आधीच केली आहे.

या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. पाकिस्तानचा हा सुपर फोर फेरीतील दुसरा सामना आहे, तर भारताचा पहिला सामना आहे. पाकिस्तानने सुपर फोरमध्ये पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळला होता, ज्यात त्यांनी 7 विकेट्सने विजय मिळवला होता.

दरम्यान, रविवारी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी विजयी संघच कायम केला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध खेळलेला 11 जणांचाच संघ भारताविरुद्धही खेळताना दिसणार आहे.

बांगलादेशविरुद्ध नसीम शाहच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. दरम्यान, त्याला आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम केले असल्याने त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Pakistan Cricket Team
'...म्हणून भारतापेक्षा आम्ही वरचढ', IND vs PAK सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

पाकिस्तानच्या संघात नसीम शाहसह शाहिन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ हे वेगवान गोलंदाजांचे त्रिकूट भारताविरुद्ध पुन्हा मैदानात उतरणार आहे.

तसेच कर्णधार बाबर आझम, इमाम उल हक, फखार जमान यांसारख्या अनुभवी खेळाडूंवर धावा करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. अष्टपैलू शादाब खान फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच उपकर्णधार म्हणूनही भूमिका पार पाडणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला आहे की, 'मला माझ्या वेगवान गोलंदाजांचा अभिमान आहे. आम्ही सर्वांवर वर्चस्व राखले आहे. मोठे सामने आणि स्पर्धा वेगवान गोलंदाजांमुळे जिंकल्या जातात. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्या यशामागील रहस्य म्हणजे ते एकत्र राहातात आणि एकमेकांवर विश्वास ठेवतात. एखाद्याचा चांगला दिवस नसेल, तर दुसरा जबाबदारी घेतो.'

Pakistan Cricket Team
IND vs PAK: केएल राहुल की इशान किशन, भारताची डोकेदुखी वाढली; कशी असणार पाकिस्तानविरुद्ध 'प्लेइंग-11'

त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट आहे. याबद्दल बाबर आझम म्हणाला, 'जे आमच्या नियंत्रणात आहे, त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. ज्यापद्धतीने सूर्य तळपत आहे, मला वाटत नाही की रविवारी फार पाऊस असेल. आम्ही शक्य तितका सराव करण्याचा प्रयत्न केला आहे.'

दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीवेळी सामना झाला होता. मात्र, पहिल्या डावानंतर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा 11 जणांचा संघ -

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आघा, इफ्तिखान अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहिम अश्रफ, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com