India vs Nepal Memes Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NEP: नेपाळविरुद्ध टीम इंडियाने सोडलेले कॅच पाहून फॅन्सला आठवला 'लगान', भन्नाट मीम्स व्हायरल

India vs Nepal: आशिया चषकात नेपाळविरुद्ध भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या काही चूका पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर केले.

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Nepal, Viral Memes:

सोमवारी भारत विरुद्ध नेपाळ संघात आशिया चषकाच्या साखळी फेरीतील सामना झाला. कँडीतील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण चर्चेचा विषय राहिला. याबद्दल अनेक मीम्सही व्हायरल झाले.

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नेपाळ संघ प्रथम फलंदाजीला उतरला.

दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणांना काही सोपे झेल घेण्याच्या संधी होती. मात्र या संधी खेळाडूंनी दवडल्या. त्यामुळे नेपाळचे सलामीवीर कुशल भुरटेल आणि असिफ शेख यांनी चांगली सुरुवात केली.

पहिल्याच षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने झेल सोडला. त्यानंतर दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर विराट कोहलीकडून, तर 5 व्या षटकात इशान किशनकडून झेल सुटले. तसेच 47 व्या षटकातही अय्यरकडून झेल घेताना चूक झाली आणि त्यामुळे चेंडू निसटला.

भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या या ढिसाळपणामुळे सोशल मीडियावर मात्र मीम्सचा सुळसूळाट पाहायला मिळाला.

क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणा पाहून सोशल मीडियावरील अनेक युजर्सने लगान या सुप्रसिद्ध चित्रपटातील झेल सुटल्याचा एक सीन मीम म्हणून शेअर केला आहे. तसेच याशिवाय देखील विविध गमतीशीर मीम्स अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भारताचा विजय

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास नेपाळने प्रथम फलंदाजी करताना  48.2 षटकात सर्वबाद 230 धावा केल्या. नेपाळकडून असिफ शेखने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सोमपाल कामीने 48 धावांची खेळी केली, तर भुरटेलने 38 धावांची खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे भारतासमोर डकवर्थ लुइस नियमानुसार 23 षटकात 145 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. हे आव्हान भारताने 20.1 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले आणि सामना जिंकला. याबरोबरच भारताने सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित केला. भारताकडून रोहित शर्माने नाबाद ७४ धावा आणि शुभमन गिलने नाबाद ६७ धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT