Rohit Sharma & Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: रोहित-विराट जोडी 'पाकिस्तान'ला पडणार भारी... रचणार का हा नवा रेकॉर्ड

Asia Cup 2023 Virat-Rohit Record: आशिया चषक 2023 मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना खेळवला जाईल.

Manish Jadhav

Asia Cup 2023 Virat-Rohit Record: आशिया चषक 2023 मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना खेळवला जाईल. जेव्हा-जेव्हा दोन देशांमधला सामना होतो तेव्हा अनेक विक्रम मोडले जातात आणि बनवले जातात.

अशा स्थितीत भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी असेल.

रोहित आणि विराटची जोडी आश्चर्यकारक ठरेल

रोहित आणि कोहली यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम मोडले आहेत, पण बुधवारी त्यांना एक जोडी म्हणून विश्वविक्रम करण्याची संधी मिळणार आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारी जोडी बनण्यासाठी फक्त दोन धावांची गरज आहे.

जोडी म्हणून त्यांनी 85 डावात 62.47 च्या सरासरीने 4998 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 60 पेक्षा जास्त सरासरीने 4000 हून अधिक धावा करणारी ही एकमेव जोडी आहे. त्यांनी 18 शतकी भागीदारी केल्या आहेत.

कोहली आणि रोहित या दिग्गजांना मागे सोडतील

रोहित आणि कोहलीने मिळून पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 2 धावा केल्या तर ते वेस्ट इंडिजचे महान खेळाडू गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स यांना मागे टाकतील, ज्यांच्या नावावर सध्या 97 डावांमध्ये 5000 वनडे धावा पूर्ण करण्याचा विक्रम आहे.

त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन/अॅडम गिलख्रिस्ट (104), श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान/कुमार संगकारा (105) यांचा क्रमांक लागतो.

विशेष म्हणजे, 5000 वनडे धावा करणाऱ्या सध्याच्या सर्वात जलद भारतीय जोडीमध्ये रोहितचाही समावेश आहे. त्याने शिखर धवनसोबत 112 डावात ही कामगिरी केली होती.

सचिन आणि द्रविड यांच्या नावावर विश्वविक्रम आहेत

रोहित आणि कोहली ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारी पहिली नॉन-ओपनिंग भारतीय जोडी बनतील. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. त्यांच्या नावावर 176 डावात 8227 धावा आहेत.

पाकिस्तानविरुद्ध कोहली-रोहितचा उत्कृष्ट विक्रम

कर्णधार रोहित शर्मा हा सक्रिय खेळाडूंमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबर आझमच्या संघाविरुद्ध 16 सामन्यांत 720 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, चेस मास्टर विराट कोहली, ज्याच्या नावाने पाकिस्तानी गोलंदाज हादरतात, त्याने 13 डावात 536 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT