Asia Cup 2023: खुर्च्यांनी खचाखच भरलेलं स्टेडियम... अन् म्हणायचं आशिया कप पाकिस्तानमध्येच झाला पाहिजे

Pakistan vs Nepal: आशिया चषकाला बुधवारपासून सुरुवात झाली असून पाकिस्तानमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.
Asia Cup 2023 | Opening Match
Asia Cup 2023 | Opening MatchDainik Gomantak
Published on
Updated on

Empty Chairs during 1st Match Asia cup 2023 Pakistan vs Nepal at Multan:

आशिया चषकाला ३० ऑगस्टपासून सुरुवात झाली. पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात मुलतानमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी मुलतान क्रिकेट मैदानावर उद्घाटन सोहळा पार पडला.

पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद आहे. मात्र, भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तानमध्ये ४ आणि श्रीलंकेतचत ९ सामने आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, पाकिस्तानमध्येच पहिला सामना आयोजित करत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

मात्र, पहिल्याच सामन्याच प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळाला आहे. उद्घाटनावेळीही अगदी मोजके दर्शक मैदानावर उपस्थित होते. उद्घाटनावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानची गायिका ऐमा बेग आणि नेपाळची गायिका त्रिशला गुरूंग यांचे कार्यक्रम ठेवले होते.

मात्र, असे असले तरी संपूर्ण स्टेडियममधील बहुतांश खुर्च्या रिकाम्याच दिसल्या. अगदी सामना सुरु झाल्यानंतरही स्टेडियममधील खुर्च्या रिकाम्याच होत्या. प्रेक्षकांनी या सामन्याकडे पाठ फिरवल्याने मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

दरम्यान, उद्घाटनाबद्दल सांगायचे झाले, तर ऐमा बेग आणि त्रिशला गुरूंग यांच्या कार्यक्रमानंतर सामना सुरु झाला. मात्र, यादरम्यान त्रिशलाचा लूक चर्चेचा विषय ठरला. तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तसेच हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या आणि कपाळावर टिकली लावली होती.

या छोटेखानी उद्घाटन सोहळ्यानंतर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नेपाळने ७ षटकांच्या आतच पाकिस्तानच्या फखर जमान आणि इमाम-उल-हकला स्वस्तात बाद करत मोठे धक्के दिले होते.

मात्र, त्यानंतर कर्णधार बाबर आझमने शेवटपर्यंत लढा दिला. त्याला आधी मोहम्मद रिझवान आणि नंतर इफ्तिखार अहमद याने चांगली साथ दिली. बाबर अखेरच्या षटकात दीड शतकी खेळी करून बाद झाला. त्याने 131 चेंडूत 151 धावांची खेळी केली.

तसेच इफ्तिखार अहमदने 71 चेंडूत नाबाद 109 धावांची खेळी केली. रिझवानने ४४ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानने ५० षटकात ६ बाद ३४२ धावा उभारल्या आणि नेपाळसमोर ३४३ धावांचे आव्हान ठेवले. नेपाळकडून सोमपाल कोमी याने २ विकेट्स घेतल्या. तसेच करन केसी आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com