Pakistan Cricket Team  Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup: आशिया चषकाबाबत पाक क्रिकेटपटूचे बेताल वक्तव्य, म्हणाला...

Asia Cup 2023: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याबद्दल एकामागून एक पाकिस्तानी क्रिकेटपटू चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत.

Manish Jadhav

Kamran Akmal Statement On Asia Cup: यंदा आशिया चषक स्पर्धा होणार आहे, मात्र या स्पर्धेचे गूढ अद्याप उकललेले नाही. ते सुटण्याऐवजी गुंतागुंतीचे होत चालले आहे. भारताचा पाकिस्तानमध्ये आशिया कप न खेळण्यासंबंधी वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानंतर एकामागून एक पाकिस्तानी क्रिकेटपटू चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत.

दरम्यान, पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) आणि विद्यमान प्रमुख नजम सेठी यांनी आधीच सांगितले आहे की, 'जर टीम इंडिया आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये (Pakistan) आली नाही, तर आम्हीही वनडे वर्ल्डकपसाठी भारतात जाणार नाही.' या एपिसोडमध्ये आणखी एका माजी पाकिस्तानी क्रिकेटरने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

माजी क्रिकेटपटूने बेताल वक्तव्य केले

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने बेताल वक्तव्य केले आहे. जर भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात येत नसेल तर आपल्या संघानेही एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात जाऊ नये, असे तो म्हणाले.

अकमल नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये म्हणाला की, 'आम्ही जगज्जेतेही झालो आहोत. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली आहे आणि एकेकाळी आम्ही तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वलही होतो.' बीसीसीआयने (BCCI) जेव्हापासून पाकिस्तानला येण्यास नकार दिला आहे, तेव्हापासून पाकिस्तानी क्रिकेटपटू अशी वक्तव्ये करत आहेत.

पाकिस्तान आश्वासन देत आहे

आशिया कपमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) सातत्याने सांगितले जात आहे. पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसह इतर अनेक देशांचे यशस्वी दौरे केले आहेत. त्यामुळे भारतीय संघानेही पाकिस्तानात यावे.'

त्याचवेळी, बीसीसीआयने अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, भारत सरकार संघाला पाकिस्तानात जाऊ देणार नाही. त्यामुळे हे ठिकाण इतरत्र हलवावे.

वेन्यू शिफ्ट करणे आवश्यक आहे

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वीच आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण यूएईला हलवण्यात यावे, असे सांगितले आहे. भारताचे सर्व सामने यूएईमध्ये झाले पाहिजेत तर उर्वरित संघ पाकिस्तानमध्ये सामने खेळू शकतात. जर भारतीय संघ उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पोहोचला तर हे सामने देखील फक्त UAE मध्येच व्हायला हवेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

SCROLL FOR NEXT