Asia Cup 2022: या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशिया कपपूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा मिळणार आहे. स्टार सलामीवीर केएल राहुल आशिया चषकासाठी टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज दीपक चहरही पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याची निवडही जवळपास निश्चित मानली जात आहे. आशिया चषक 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत दुबई आणि शारजाह येथे टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी राहुल संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण कोविड-19 संसर्गामुळे तो नुकत्याच झालेल्या स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरा होऊ शकला नाही.चेतन शर्मांच्या नेतृत्वाखालील निवड समिती 15 खेळाडूंची निवड करते की सर्व संभाव्य पर्याय लक्षात घेऊन 17 सदस्यीय संघाची निवड करते हे पाहणे मनोरंजक असेल.
विराट कोहलीच्या जागेला कोणताही धोका नाही
विराट कोहलीचा फॉर्म हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय असला तरी या स्टार फलंदाजाच्या तिसऱ्या क्रमांकावर सध्या तरी कोणताही धोका दिसत नाही. दिनेश कार्तिकने मधल्या फळीत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे तर दीपक हुडा हा भविष्यातील पहिला बॅकअप पर्याय असेल.
गोलंदाजीत चहर झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत पुनरागमन करेल आणि आशिया चषकासाठी संघात त्याची निवड होण्याची शक्यता आहे. दुखापत होण्यापूर्वी टी-20 मध्ये भारताच्या सातत्यपूर्ण गोलंदाजांपैकी दिपक एक होता. जर तो पुनरागमन करत असेल तर त्याला गती मिळण्यासाठी बरेच सामने खेळावे लागतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.