Sri Lanka Team  Dainik Gomantak
क्रीडा

T20 WC: चॅम्पियन श्रीलंकेने विश्वचषकासाठी संघ केला जाहीर, चमिरा परतला

Sri Lanka Team: आशिया चषक 2022 च्या विजेत्या श्रीलंकेने T20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

T20 WC: आशिया चषक 2022 च्या विजेत्या श्रीलंकेने T20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. दिग्गज फलंदाज दिनेश चांदिमलला संघातून वगळण्यात आले आहे. आशिया चषकासाठी संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. त्याचवेळी वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमिरा संघात परतला आहे. T20 विश्वचषक स्पर्धेसाठी दासुन शनाका संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय आशिया कपमध्ये खेळलेले बहुतांश खेळाडू तेच आहेत.

दरम्यान, वेगवान गोलंदाज चमिरा आणि लाहिरु कुमारा यांना त्यांच्या फिटनेसच्या आधारावर स्थान देण्यात आले आहे. स्पर्धेपूर्वी त्यांची फिटनेस चाचणी होणार आहे. दोघेही दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडले होते. मात्र, असे असूनही आशिया कपमध्ये संघाची गोलंदाजी सर्वात मजबूत होती. युवा वेगवान गोलंदाज प्रमोद मदुशन (Pramod Madushan) आणि दिलशान मदुशंका यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याचबरोबर आशिया चषक संघात स्थान मिळालेल्या असिथा फर्नांडो आणि मथिशा पाथिराना यांना संघातून वगळण्यात आले आहे.

दुसरीकडे, चांदिमलशिवाय अशेन बंदारा, नुवानिडू फर्नांडो आणि फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रम यांनाही टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) संघातून वगळण्यात आले आहे. या चौघांनाही राखीव म्हणून संघात ठेवण्यात आले आहे. याशिवाय डावखुरा वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो हाही राखीव खेळाडू असेल.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ: दासुन शनाका (कर्णधार), भानुक राजपक्षे, चमिरा करुणारत्ने, दानुष्का गुनाथिलका, धनंजया डी सिल्वा, दुष्मंथा चमिरा (फिटनेस), पथुम निसांका, वानिंदू हसरंगा, लाहिरु कुमारा (फिटनेस आधारावर), महेश तिक्ष्णा, दिलशान मदुशांका, चारिथ अस्लांका, जेफ्री वेंडरसे, प्रमोद मदुशन.

स्टँडबाय: दिनेश चांदिमल, अशेन बंदारा, नुवानिडू फर्नांडो, प्रवीण जयविक्रम, बिनुरा फर्नांडो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT