Ashok Sharma fastest delivery IPL 2026 Dainik Gomantak
क्रीडा

Fastest Delivery In IPL 2026: सुसाट अशोक शर्मा! 154.2 kmph च्या वेगाने टाकला IPL 2026 मधील सर्वात वेगवान चेंडू Watch Video

Ashok Sharma fastest delivery IPL 2026: गुजरात टायटन्सचा २३ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज अशोक शर्मा याने आपल्या गोलंदाजीच्या वेगाने क्रिकेट विश्वात खळबळ माजवून दिली आहे.

Sameer Amunekar

आयपीएल २०२६ मध्ये आता वेगाचे नवे समीकरण पाहायला मिळत आहे. गुजरात टायटन्सचा २३ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज अशोक शर्मा याने आपल्या गोलंदाजीच्या वेगाने क्रिकेट विश्वात खळबळ माजवून दिली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने चक्क १५४.२ किमी प्रति तास या वेगाने चेंडू फेकून या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

जखमी असतानाही वेगाचा धडाका

या सामन्यातील १६ व्या षटकात अशोक शर्माने आपल्या वेगाचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, या विक्रमी चेंडूच्या काही काळ आधीच डोनोवन फरेराचा एक जोरात आलेला शॉट अडवण्याच्या प्रयत्नात अशोकच्या बोटाला दुखापत झाली होती. मात्र, वेदनेकडे दुर्लक्ष करत त्याने मैदानावरच राहण्याचा निर्णय घेतला. त्याने प्रथम फरेराला १५०.७ किमी वेगाने चेंडू टाकला आणि त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर १५४.२ किमी वेगाचा अचूक यॉर्कर ध्रुव जुरेलला फेकला. हा चेंडू इतका वेगवान होता की फलंदाजाला तो नेमका कुठे गेला हे कळलेच नाही.

डेल स्टेनकडून कौतुकाची थाप

जगातील महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या डेल स्टेनने अशोकच्या गोलंदाजीचे मनापासून कौतुक केले आहे. स्टेन म्हणाला की, "अशोकचा रन-अप अत्यंत वेगवान आहे आणि चेंडू सोडताना त्याचे डोके स्थिर राहते. एक्सप्रेस पेसर्समध्ये सहसा न दिसणारा 'क्लीन ॲक्शन' त्याच्याकडे आहे." अशोकने केवळ एका चेंडूवरच नव्हे, तर आपल्या ४ षटकांच्या कोट्यात तब्बल तीन वेळा १५० किमी वेगाचा टप्पा ओलांडून आपली सातत्यपूर्ण ताकद सिद्ध केली.

या कामगिरीसह अशोक शर्मा आता आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या यादीत उमरान मलिक (१५७ किमी) पहिल्या, तर मयंक यादव (१५६.७ किमी) दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशोकने आता १५४.२ किमी वेगासह या यादीत स्वतःचे स्थान पक्के केले आहे. या हंगामात त्याने एनरिक नॉर्खिया (१५०.९ किमी) आणि कागिसो रबाडा यांसारख्या परदेशी वेगवान गोलंदाजांनाही मागे टाकले आहे.

नेट बॉलर ते करोडपती स्टारचा प्रवास

अशोक शर्मा हा मूळचा राजस्थानचा असून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. एकेकाळी राजस्थान रॉयल्सचा नेट बॉलर असलेल्या अशोकला २०२२ मध्ये केकेआरने ५५ लाखांत विकत घेतले होते, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. २०२५ मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सने ३० लाखांत घेतले, पण तिथेही तो बेंचवरच राहिला. शेवटी २०२६ च्या हंगामापूर्वी गुजरात टायटन्सने त्याच्यावर ९० लाखांचा विश्वास दाखवला आणि अशोकने आपल्या पदार्पणाच्या सामन्यांपासूनच (पंजाब किंग्ज विरुद्ध १४९.७ किमी वेगाने) स्वतःची छाप सोडण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT