Stuart Broad Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023: स्टुअर्ट ब्रॉडने गाठला 600 विकेट्सचा टप्पा, मुरलीधरन-वॉर्नच्या खास क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री!

Stuart Broad: बुधवारपासून मँचेस्टर येथे सुरु झालेल्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करुन त्याने हा टप्पा पार केला.

Manish Jadhav

Ashes 2023: इंग्लंडचा झंझावाती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा आकडा गाठला आहे. बुधवारपासून मँचेस्टर येथे सुरु झालेल्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करुन त्याने हा टप्पा पार केला.

600 विकेट्ससह ब्रॉड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जगातील पाचवा गोलंदाज ठरला आहे. यासह त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

दरम्यान, ब्रॉड ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) इंग्लंडचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 149 विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत त्याने इयान बॉथमला मागे टाकले. ज्याने 148 विकेट घेतल्या होत्या.

अनिल कुंबळेचा विक्रम धोक्यात

दुसरीकडे, भारतीय दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) विक्रमाच्या जवळ ब्रॉड पोहोचला आहे. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या कुंबळेने कारकिर्दीत 619 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रॉडला त्याचा विक्रम मोडण्यासाठी 20 विकेट कमी आहेत. विशेष म्हणजे, जेम्स अँडरसननंतर ब्रॉड हा जगातील सर्वाधिक बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

तथापि, कसोटीत, त्याने इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त सामन्यांमध्ये 600 बळींचा टप्पा गाठला. पाच गोलंदाजांपैकी ब्रॉडने हा टप्पा गाठण्यासाठी सर्वाधिक 166 कसोटी सामने खेळले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स (इंग्लंड)

149 एस ब्रॉड

148 इयान बॉथम

128 बॉब विलिस

115 जे अँडरसन

109 डब्ल्यू रोड्स

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स

800 M मुरलीधरन

708 एस वॉर्न

688 जे अँडरसन

619 ए कुंबळे

600 एस ब्रॉड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT