Ollie Robinson Dainik Gomantak
क्रीडा

रॉबिन्सनने ज्यांना 11 वा फलंदाज म्हटले, त्यांनीच इंग्लंडला पहिल्या Ashes मॅचमध्ये दाखवले दिवसा तारे

Ashes 2023, 1st test: पहिला ऍशेस सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रॉबिन्सनने केलेल्या एका व्यक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Pranali Kodre

Ashes 2023, Ollie Robinson on Australia's Tailenders: मंगळवारी (20 जून) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडीही मिळवली. दरम्यान, या सामन्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनचे पहिल्या डावानंतरचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.

या सामन्यात अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने जेव्हा ऍलेक्स कॅरीच्या रुपात 8 वी विकेट गमावली, तेव्हा त्यांना विजयासाठी जवळपास 16 षटकांमध्ये 54 धावांची गरज होती. तसेच इंग्लंडला विजयासाठी केवळ 2 विकेट्सची गरज होती.

मात्र, त्यानंतर 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिचा कर्णधार पॅट कमिन्सला (44*) 10 व्या क्रमांकावरील नॅथन लायनने (16*) भक्कम साथ दिली. या दोघांनी 9 व्या विकेटसाठी 55 धावांची नाबाद भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

त्यामुळे रॉबिन्सनने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावानंतर तिसऱ्या दिवसाखेर केलेले वक्तव्य चर्चेत आहे. रॉबिन्सनने म्हटले होते की कमिन्सला बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे उरलेले सर्व खेळाडू (उरलेले 3 खेळाडू) 11 व्या क्रमांकाच्या फलंदाजासारखेच आहेत. पण त्याचे हेच वक्तव्य आता त्याच्या अंगलट आल्याचे दिसून आले आहे.

कारण पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून 9 व्या क्रमांकावर नॅथन लायनने, 10 व्या क्रमांकावर स्कॉट बोलंड आणि 11 व्या क्रमांकावर जोश हेजलवूडने फलंदाजी केली होती. यातील बोलंडने दुसऱ्या डावात नाईटवॉचमन म्हणून खेळताना उस्मान ख्वाजाला चांगली साथ दिली होती. या दोघांमध्ये 71 चेंडूत 32 धावांची भागीदारी झाली.

या भागीदारीमुळे अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव स्थिरावण्याच मदत झाली होती. बोलंडने 20 धावांची खेळी केली. तसेच अखेरीस लायननेही कमिन्सला साथ देत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यामुळे हेजलवूडला फलंदाजीला येण्याची दुसऱ्या डावात गरजच पडली नाही.

याच कारणामुळे सध्या रॉबिन्सनवर अनेकांनी कोणालाही कमी लेखू नये अशी टीका केली आहे.

ख्वाजा ठरला सामनावीराचा मानकरी

दरम्यान, पहिल्या ऍशेस सामन्यातील सामनावीराचा मानकरी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा ठरला आहे. त्याने पहिल्या डावात 321 चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांसह 141 धावा केल्या. तसेच दुसऱ्या डावात त्याने 197 चेंडूत 65 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT