Mithali Raj Dainik Gomantak
क्रीडा

Mithali Raj चा धमाका, Women ODIs मध्ये असा रेकॉर्ड करणारी ठरली पहिली क्रिकेटर

महिला क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 5000 धावा करणारी ती पहिली कर्णधार ठरली आहे. मितालीने (Mithali Raj) आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून एकूण 5030 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

New Zealand Women vs India Women, 2nd ODI: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या महिला ODI सामन्यात मिताली राजने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मितालीने भारतीय महिला क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. परंतु आता तिच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला आहे, ज्यामुळे ती महिला क्रिकेटर (Womens Cricket) विश्वातील सर्वोत्तम कर्णधार म्हणूनही ओळखली जाणार आहे. खरं तर, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मितालीने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 61 वे अर्धशतक झळकावले आणि 66 धावांवर नाबाद राहिली. या डावात मितालीने 81 चेंडूंचा सामना करत 3 चौकार मारण्यात ती यशस्वी ठरली. मितालीने (Mithali Raj) तिच्या अर्धशतकी खेळीत कर्णधार म्हणून महिला वनडेत 5000 धावा पूर्ण केल्या. महिला क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 5000 धावा करणारी ती पहिली कर्णधार ठरली आहे. मितालीने आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून एकूण 5030 धावा केल्या आहेत. (As Captain In Womens Cricket Mithali Raj Became The First Captain To Score 5000 Runs)

दरम्यान, दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची (Australia) माजी कर्णधार बेलिंडा क्लार्कने कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4150 धावा केल्या आहेत. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स (Charlotte Edwards) आहे, जिने वनडेमध्ये कर्णधार म्हणून 3523 धावा केल्या आहेत. या क्रमवारीत न्यूझीलंडची (New Zealand) सुझी बेट्स चौथ्या क्रमांकावर आहे, जिने कर्णधार म्हणून 3214 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने कर्णधार म्हणून वनडेमध्ये आतापर्यंत 3016 धावा केल्या आहेत.

तसेच, न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे तर, ओव्हल, क्वीन्सटाउनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 6 गडी गमावून 270 धावा केल्या. ऋचा घोषने (Richa Ghosh) भारतासाठी धमाका केला. तिने 64 चेंडूत 65 धावा केल्या, ज्यात तिने सहा चौकार आणि एक षटकार मारला. दुसरीकडे कर्णधार मिताली 81 चेंडूत 66 धावा करुन नाबाद राहिली. सलामीवीर सभिनेनी मेघनाने 49 धावा केल्या.

शिवाय, पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा 132 धावांनी पराभव केला होता. याशिवाय एकमेव T20 मध्ये न्यूझीलंडच्या महिला खेळाडूंनी शानदार खेळी करत भारताचा 18 धावांनी पराभव केला होता. न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय महिला खेळाडूंची कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

शिक्षकच आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात तेव्हा... सरकारी शाळांच्या विश्वासार्हतेचे काय?

Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

बिहारचा बाहुबली ते दिल्लीचा दरबारी; नितीन नवीन यांच्या संघटनात्मक कौशल्याची आता राष्ट्रीय कसोटी- संपादकीय

Shashi Tharoor Viral Tweet: "न्यूझीलंडच्या धावांपेक्षा अधिक मी सेल्फी दिल्या'' नागपूरच्या मैदानावर शशी थरुर यांची फटकेबाजी; व्हायरल ट्विटनं जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT