Charith Asalanka Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: फलंदाजांसाठी भारतातील 'हे' मैदान बनले स्वर्ग, विश्वचषकाच्या इतिहासात झळकली सर्वाधिक शतके

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. यंदा या स्पर्धेत सर्वात मोठी धावसंख्या बनवण्यापासून ते सर्वाधिक षटकार ठोकण्यापर्यंतचे विक्रम मोडीत निघाले आहेत.

त्याचबरोबर विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकही यंदा पाहायला मिळाले. भारतातील एक मैदान हे फलंदाजांसाठी स्वर्ग ठरले आहे. विश्वचषकाच्या इतिहासात या मैदानावर सर्वाधिक शतके झाली आहेत.

विश्वचषकाच्या इतिहासात इथे सर्वाधिक शतके झळकली

दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 38 वा सामना बांगलादेश (Bangladesh) आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज चरिथ असलंकाच्या बॅटमधून शानदार शतक आले. त्याने 105 चेंडूत 108 धावा केल्या.

अरुण जेटली स्टेडियमवर 2023 च्या विश्वचषकातील हे 7 वे शतक आहे. त्याचवेळी, जर एकूण आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, विश्वचषक इतिहासातील अरुण जेटली स्टेडियममधील हे 9 वे शतक आहे.

ओल्ड ट्रॅफर्डला मागे टाकेल

2023 च्या विश्वचषकापूर्वी (World Cup), ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे सर्वाधिक शतके झळकावली गेली. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे झालेल्या विश्वचषकाच्या इतिहासात एकूण 8 शतके झाली आहेत. त्याचबरोबर, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचाही या यादीत समावेश आहे.

वानखेडे स्टेडियमवर एकूण 8 विश्वचषक शतके झळकली आहेत. या मैदानावर अजून सामने व्हायचे आहेत. अशा परिस्थितीत वानखेडे स्टेडियम ओल्ड ट्रॅफर्ड मैदानालाही मागे टाकू शकेल, अशी शक्यता आहे.

विश्वचषकात एकाच मैदानावर सर्वाधिक शतके

9 शतके - अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

8 शतके - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

8 शतके - वानखेडे स्टेडियम, मुंबई

अरुण जेटली स्टेडियममध्ये शतके ठोकणारे फलंदाज

चरिथ असलंका - वर्ष 2023

क्विंटन डी कॉक - वर्ष 2023

एडन मार्कराम - वर्ष 2023

ग्लेन मॅक्सवेल - वर्ष 2023

रोहित शर्मा - वर्ष 2023

रॅसी व्हॅन डेर डुसेन - वर्ष 2023

डेव्हिड वॉर्नर - वर्ष 2023

एबी डिव्हिलियर्स - वर्ष 2011

सचिन तेंडुलकर - वर्ष 1996

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT