Arjun Tendulkar  Dainik Gomantak
क्रीडा

मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर अखेर मैदानात उतरणार ?

अर्जुनचे पदार्पण कधी होणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) च्या प्लेऑफमधून बाहेर पडलेला मुंबई इंडियन्स संघ आता नवीन खेळाडूंना संधी देत ​​आहे. मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधि मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, अर्जुनचा संघात समावेश करण्यात आला नाही. (Arjun Tendulkar to debut in IPL 2022 against Delhi Capitals)

अर्जुनचे पदार्पण कधी होणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. याबाबत कर्णधार रोहित शर्माने आता एक मोठे संकेत दिले आहेत. तो म्हणाला, आम्ही सतत नवीन खेळाडूंना संधी देत ​​आहोत. याचा फायदा आम्हाला पुढील मोसमात होईल. यामुळे अर्जुन तेंडुलकर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित म्हणाला, या सामन्यात मयंक मार्कंडेय आणि संजय यादव यांना खेळवण्यात येणार आहे. तर शेवटच्या सामन्यातही काही नवीन खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. मुंबई इंडियन्सला या मोसमातील शेवटचा सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. रोहित शर्माच्या या वक्तव्यानंतर अर्जुन तेंडुलकर ट्विटरवर ट्रेंड करू लागला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण निश्चित असल्याचा अंदाज ट्विटर वापरकर्त्यांनी वर्तवला आहे.

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना घेतले होते. गेल्या मोसमातही अर्जुन तेंडुलकरला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते, पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. या हंगामातही आतापर्यंत तेच घडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT