बांदोडकर करंडकात जीनो क्लबचे आव्हान कायम

बांदोडकर करंडक क्रिकेट स्पर्धेत जीनोची धेंपो क्लबवर 11 धावांनी मात
Bandodkar trophy Cricket
Bandodkar trophy CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : जीनो स्पोर्टस क्लबने बांदोडकर करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आव्हान कायम राखताना धेंपो क्रिकेट क्लबवर 11 धावांनी मात केली. पणजी जिमखान्याच्या या स्पर्धेतील सामना मंगळवारी कांपाल भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.

एमसीसी संघाविरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लबला शेवटच्या चार षटकांत 40 धावांची गरज असताना अंधूक प्रकाश आणि पावसामुळे सामना अर्धवट राहिला. ही लढत बुधवारी पुन्हा खेळविण्यात येईल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. एमसीसीने 8 बाद 140 धावा केल्यानंतर चौगुलेने 16 षटकांत 5 बाद 101 धावा केल्या होत्या. पुन्हा होणारा सामना स्पर्धेच्या विश्रांतीच्या दिवशी बुधवारी (ता. 18) दुपारी खेळला जाईल.

Bandodkar trophy Cricket
आरसीबीसह 4 संघांचे भवितव्य मुंबईच्या सामन्यावर अवलंबून

सकाळच्या सत्रात जीनो क्लबने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 138 धावा केल्या. सलामीच्या आर्यन नार्वेकर याच्या अर्धशतकामुळे जीसीए प्रीमियर लीग विजेत्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. धेंपो क्लबला विजयासाठी शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. वेगवान ऋत्विक नाईकने फक्त एक धाव देत शेवटचे दोन्ही गडी बाद करून जीनो क्लबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Bandodkar trophy Cricket
पंजाबला हरवून दिल्लीची प्लेऑफमध्ये धडक

‘अ’ गटातील स्थिती

स्पर्धेच्या अ गटात साळगावकर क्रिकेट क्लबने पहिल्याच सामन्यात विजय नोंदवून दोन गुणांची कमाई केली. त्यांची धावसरासरी 1.181 अशी आहे. जीनो क्लबची साखळी फेरीतील मोहीम संपली असून त्यांचे दोन लढतीतून दोन गुण असून -0.140 धावसरासरी आहे. धेंपो क्लबला एका लढतीत पराभव पत्करावा लागला असून त्यांची धावसरासरी -0.550 आहे. या गटातील शेवटचा सामना गुरुवारी साळगावकर व धेंपो क्लब यांच्यात होईल, त्यानंतर उपांत्य फेरीतील संघ निश्चित होतील.

संक्षिप्त धावफलक

जीनो स्पोर्टस क्लब : 20 षटकांत 8 बाद 138 (आर्यन नार्वेकर 57, शिवम आमोणकर 12, गौरीश कांबळी 18, दीपक खत्री 15, दिव्यांग हिंगणेकर 2-18, अझीम काझी 3-22, मलिक सिरूर 2-25) वि. वि. धेंपो स्पोर्टस क्लब : 19.3 षटकांत सर्वबाद 127 (स्नेहल कवठणकर 31, जय आहुजा 37, दिव्यांग हिंगणेकर 12, विकास सिंग 19, मोहित रेडकर 2-14, ऋत्विक नाईक 3-20, दीपक खत्री 2-27, अमूल्य पांड्रेकर 1-37).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com